close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

PHOTO : अखेर ती आली, तिने पाहिलं आणि...

कलाविश्व आणि रुपेरी पडद्यापासून दूर असणारी अभिनेत्री सोनाली ......

ANI | Updated: Dec 3, 2018, 07:27 AM IST
PHOTO : अखेर ती आली, तिने पाहिलं आणि...

मुंबई : कलाविश्व आणि रुपेरी पडद्यापासून दूर असणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे अखेर मायदेशी परतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने याविषयीची माहिती दिली. ज्यानंतर 'एएनआय' या वृत्तसंस्थेने मुंबई विमानतळावरील सोनालीचे फोटो पोस्ट केले. 

आपल्या स्मितहास्याने प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या सोनालीच्या चेहऱ्यावर ती भारतात परतली तेव्हा एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. तिने विमानतळावर हात जोडून चाहत्यांना अभिवादन करत त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रेमाचा स्वीकार केला. यावेळी पती गोल्डी बेहेलसुद्धा तिच्यासोबत होता. 

'सोनालीची प्रकृती उत्तम आहे. ती चांगल्यासाठीच परतली आहे. मुळात या आजारातून ती अतिशय चांगल्या पद्धतीने स्वत:ला सावरत आहे', असं गोल्डी म्हणाला. सध्याच्या घडीला सोनालीवरील उपचार पूर्ण झाले असले तरीही हा आजार कधीही परतू शकतो. त्यामुळे नियमित तपासणी सुरु राहणार असल्याची माहितीही त्याने दिली. 

बरेच महिने मायदेशापासून दूर राहिल्यानंतर आता सोनाली अखेर भारतात परतली आहे. त्यामुळे अर्थातच चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अतिशय खंबीरपणे या आजाराशी झुंज देणाऱ्या या अभिनेत्रीच्या प्रकृतीत आणखी लवकरात लवकर सुघधारणा व्हावी अशीच प्रार्थना चाहते करत आहेत. 

जुलै महिन्यात सोनालीने तिच्या आजारपणाविषयीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. ज्यानंतर ती परदेशात या आजारावरील उपचारासाठी रवाना झाली होती. आपल्या देशापासून हजारो मैल दूर असूनही तिने चाहत्यांशी असणारं नातं सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय सुरेखपणे जपल्याचं पाहायला मिळालं. आता ती भारतात परतली आहे ही चाहत्यांसोबतच संपूर्ण कलाविश्वासाठी अतिशय आनंदाची बाब आहे, हे खरं.