'या' मॉडेलला डेट करतेय सुष्मिता ?

सुष्मिताच्या मुलींसोबतही त्याचं चांगलं नातं...    

Updated: Oct 16, 2018, 02:01 PM IST
'या' मॉडेलला डेट करतेय सुष्मिता ? title=

मुंबई: सेलिब्रिटींच्या रुपेरी पडद्यावरील आयुष्यासोबतच त्यांच्या खासगी आयुष्याविषयीसुद्धा चाहत्यांमध्ये बरंच कुतूहल असतं. सध्याच्या घडीला अशाच एका अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याविषयीची माहिती समोर आली आहे. मुख्य म्हणजे ती कोणाला डेट करत आहे, याविषयीचीच ही माहिती आहे.

डेटिंग आणि रिलेशनशिपच्या चर्चांमुळे प्रकाशझोतात येणारी ही अभिनेत्री म्हणजे सुष्मिता सेन. 

आपल्या अदानी रसिकांना घायाळ करणारी सुष्मिता रॉमन शॉल या मॉडेलला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. 

काही दिवसांपूर्वीच एका फॅशन शोमध्ये या दोघांना एकत्रही पाहिलं गेलं होतं. 

सुष्मिताने कधीच तिच्या खासगी आयुष्याविषयी माध्यमांसमोर फार चर्चा केली नाही. 

शक्य त्या वेळी तिने याविषयीची माहिती गुलदस्त्यातच ठेवण्याला प्राधान्य दिलं. आतासुद्धा ती आणि रॉमन दोघंही त्यांच्या नात्याविषयी कोणतेच संकेत देत नाही आहेत. 

या दोघांमध्ये वाढणारी जवळीत आणि त्यांचं एकंदर नातं पाहता, चर्चांना उधाण आलं आहे हे मात्र खरं.

सुष्मिताच्या मुलींसोबतही रॉमनचं चांगलं नातं असून, तो त्यांच्यासोबतही जास्त वेळ व्यतीत करताना दिसतो. त्यामुळे आता येत्या काळात या नात्याला कोणतं वळण मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तुर्तास रॉमनच्या रुपात सुष्मिताना प्रेमाचं माणूस मिळालं या चर्चांनीच तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.