मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन हिनं कायमच तिच्या खासगी आयुष्याबाबत काही गोष्टी खुलेपणानं सर्वांसमोर आणल्या आहेत. कामाच्या बाबतीत सुष्मिता जितकी पारदर्शक राहिली, तितकंच तिनं आपलं खासगी आयुष्यही सहजपणे सर्वांसमोर आणलं. मॉडेल रोमन शॉल याच्यासोबत रिलेशनषिपमध्ये आल्यापासून ते अगदी या नात्यातून वेगळं होईपर्यंतची माहितीही खुद्द सुष्मितानंच दिली. (Sushmita sen)
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सुष्मितानं या ब्रेकअपबाबत वक्तव्य केलं.
'माझ्यासाठी एखादी गोष्ट बंद होणं ही एक मोठी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही एक प्रसिद्ध व्यक्ती असता, त्यावेळी तुमच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीवरही इतरांच्या नजरा असतात.
किंबहुना त्या व्यक्ती ज्या ठिकाणी असता त्यांना तुम्हीच तिथपर्यंत पोहोचवलेलं असतं.
हे त्या व्यक्तीसाठी, त्याच्या आयुष्यासाठी आणि तुमच्याही आयुष्यासाठी चांगलं नाही की तुम्ही सर्वच भावना कवटाळून रहाल, किंवा नात्यात विचार करत राहाल', असं ती म्हणाली.
नात्यामध्ये ते नातं बंद होणं हे दोघांसाठीही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणजे अमुक व्यक्ती त्यांच्या आयुष्याप पुढे जाऊ शकतात असं सुष्मिता म्हणाली.
रोमन आणि आपल्या नात्यात असणारी मैत्री मात्र कायम राहील ही बाबही तिनं तितक्याच प्रकर्षानं मांडली.
Year End 2021 : ब्रेकअपनं सरत्या वर्षाला निरोप, येत्या वर्षातून काय अपेक्षा ठेवतेय सुष्मिता ?
आपण आता ज्या वयात आहोत त्यावेळी घडलेल्या या भयंकर गोष्टींचा विचारकरत राहिले तर, माझं जगणंच व्यर्थ गेल्याची जाणीव करुन देणारं असतं, हा मुद्दा तिनं मांडला.
आपण प्रेमात होतो, त्यावेली सर्वस्व अर्पण केलं होतं आणि नातं तुटतं तेव्हाही हाच नियम लागू होतो या विचारांची सुष्मिता आहे हे तिच्या बोलण्यातून स्पष्ट झालं.
आयुष्य म्हणजे कोणत्या एका गोष्टीसाठी अडकून राहणं, हाच अर्थ होत नाही, असं म्हणत सुष्मितानं आपल्या जीवनात आलेल्या या वळणाचा मोठ्या मनानं स्वीकार केला.