'गुस्सा निकालती है' म्हणणाऱ्या मोदींना ट्विंकलचं उत्तर

मोदींना ट्विंकल म्हणतेय....

Updated: Apr 24, 2019, 04:24 PM IST
'गुस्सा निकालती है' म्हणणाऱ्या मोदींना ट्विंकलचं उत्तर

नवी दिल्ली : संपूर्ण देशात सध्या लोकसभा निवडणुकांच्याच वातावरणाची रंगत सुरू असताना राजकीय वाटांपासून थोडं दूर येत अभिनेता अक्षय कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक अराजकीय मुलाखत घेतली. खासगी आयुष्यापासून, विरोधी पक्षनेत्यांनी असणारे त्यांचे मित्रत्वाचे संबंध याविषयी या मुलाखतीत पंतप्रधानांनी दिलखुलास गप्पा मारल्या. याच मुलाखतीत त्यांनी खिलाडी कुमारचीही फिरकी घेतल्याचं पाहायला मिळालं. 

अक्षयच्या पत्नीच्या म्हणजेच ट्विंकल खन्ना हिच्या ट्विचचा विषय काढत मोदींनी खिलाडी कुमारलाच पेचात पाडलं. अक्षय तुझ्या कुटुंबात कलह तसा कमीच असेल, ज्यासाठी मी स्वत:ला श्रेय देतो; असं मोदी मोठ्या विनोदी अंदाजात म्हणाले. ट्विंकलचे ट्विट आपण पाहतो आणि तिच्या ट्विटच्या माध्यमातून आपल्यावर निघणारा राग पाहता तुझ्या संसारातच काही वादच नसेल, असं ते म्हणाले. 

PM मोदी की चाह थी संन्यासी बनूं या सोल्जर और कैसे भटकते-भटकते प्रधानमंत्री बन गए

पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर ट्विंकलनेही तिच्या शैलीत ट्विट करतच उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. 'मोदींच्या या वक्तव्याकडे मी फक्त सकारात्मक दृष्टीने पाहते. मुळात यामुळे माझ्या अस्तित्वासोबत माझ्या कामाकडे (ट्विट आणि लिखाणाकडे) त्यांचं लक्ष असल्याचं स्पष्ट होत आहे' असं, ती ट्विट करत म्हणाली. 

ट्विंकलने केलेलं हे ट्विट पाहता आता मोदी त्यावर काही प्रतिक्रिया देणार का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, अक्षय आणि पंतप्रधानांच्या या गप्पा राजकीय वर्तुळापासून वेगळ्या असल्या तरीही त्याविषयीच्या चर्चा मात्र सुरू झाल्या आहेत. मुळात मोदींचा हा अंदाज सोशल मीडियावर विशेष लक्षवेधी ठरला आहे.