मंत्र्यांसोबत जेवण्यास नकार देताच विद्या बालनला मिळालं असं उत्तर...

ती या भागात चित्रीकरण करु शकेल असं चित्र काही दिसत नाही.

Updated: Nov 30, 2020, 06:22 PM IST
मंत्र्यांसोबत जेवण्यास नकार देताच विद्या बालनला मिळालं असं उत्तर...   title=

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत मागील काही दिवसांपासून मध्य प्रदेशात तिच्या आगामी 'शेरनी' sherni या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. जवळपास एक महिन्यापासून ती या राज्यातील वनक्षेत्रात चित्रीकरण करत आहे. पण, आता मात्र यापुढं ती या भागात चित्रीकरण करु शकेल असं चित्र काही दिसत नाही. त्यामागचं कारण सर्वांचंच लक्ष वेधत आहे. 

माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या काही वृत्तांनुसार मध्य प्रदेशातील मंत्री विजय शाह यांनी हे चित्रीकरण थांबवल्याचं म्हटलं जात आहे. Vidya Balan  विद्या बालन हिनं त्यांना पाठवलेलं जेवणाचं निमंत्रण नाकारल्यामुळंच त्यांनी तिला अशा पद्धतीनं उत्तर दिल्याचं म्हटलं जात आहे. पण, मंत्रीमहोदयांनी मात्र या सर्व चर्चा धुडकावून लावल्या आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार शाह यांनी विद्याला दुपारच्या/ रात्रीच्या जेवणासाठी बोलावलं होतं. पण, संकोलचेपणामुळं तिनं त्यांचं बोलावणं नाकारलं. ज्यानंतरच सदर मंत्र्यांनी वनक्षेत्रामध्ये चित्रीकरण करण्याचा परवानाच रद्द केल्याचं म्हटलं गेलं. 

एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार चित्रीकरण करण्यासाठी चित्रपटाच्या टीमच्या वाहनांना या वनक्षेत्रात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं. एकिकडे यासंबंधीच्या चर्चा जोर धरु लागलेल्या असतानाच दुसरीकडे मंत्र्यांनी मात्र आपण स्वत:च विद्याच्या जेवणासाठीच्या बोलवण्यास नकार दिल्याची भूमिका मांडली. 

 

'बालाघाट येथे मी चित्रीकरणासाठी परवानगी मागणाऱ्यांच्या विनंतीवरुनच गेलो होतो. त्यांनी मला जेवणासाठी येण्याची विनंती केली. पण, मला सध्या हे शक्य नसल्याचं सांगत महाराष्ट्रात आल्यावर नक्की भेट घेईन असं मी त्यांना सांगितलं. जेवणाचा बेतच रद्द झाला. चित्रीकरणाचा नाही', असं वक्तव्य या मंत्र्यांनी केल्याचं कळत आहे. तेव्हा आता नेमकं खरं काय हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. तर, मंत्र्यांच्या या कृतीची बरीच चर्चाही होऊ लागली आहे.