....म्हणून चोराने विकले 'महागुरुं'चे पुरस्कार

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार....

Updated: Oct 4, 2019, 11:19 AM IST
....म्हणून चोराने विकले 'महागुरुं'चे पुरस्कार  title=
....म्हणून चोराने विकले महागुरुंचे पुरस्कार

मुंबई : मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर वेगळं स्थान प्रस्थापित करणाऱ्या अभिनेता सचिन पिळगावकर यांच्या कार्यालयात चोरी झाली आहे. ज्यानंतर पिळगावकर यांच्याकडे काम करणाऱ्या नोकराला सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमृत सोलंकी हा पिळगावकर यांच्या घरी काम करणारा विश्वासू नोकर होता. ज्याने पिळगावकर यांना मिळालेली काही सन्मानचिन्हं चोरली आणि ती भंगारात विकली. काहीशा पैशांसाठी त्याने ही चोरी केली. ज्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्याच्या घडीला सोलंकीच्या नावे भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सांताक्रुझ पोलीस स्थानकात सचिन यांनी त्यांच्या घरातील पुरस्काररुपी सन्मानचिन्हं चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. कार्यालयातून हे पुरस्कार चोरीला गेल्याचं त्यांनी दाखल  केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. सांताक्रुझ (पश्चिम) येथील जुहू तारा रोड येथे असणाऱ्या जुहू अपार्टमेंट्स येथील त्यांच्या कार्यालयात ही चोरी झाली. यावेळी त्या ठिकाणी नुतनीतकणाचं काम सुरु होतं, अशी माहितीही पिळगावकर यांनी दिली.  

मंगळवारी हे पुरस्कर त्यांच्या जागी नसल्याचं सचिन यांच्या पत्नी सुप्रिया पिळगावकर यांच्या नजरेस आलं. ज्यानंतर त्यांनी पिळगावकर यांना याविषयीची माहिती दिली. पुढे  खुद्द सचिन यांनीच त्यांचा विश्वासू नोकर, अमृत सोलंकी याच्याकडे याविषयीची चौकशी केली. 

सोलंकीने सांगितल्यानुसार पुरस्कारांवर धुळ बसून ते खराब होऊ नयेत यासाठी ते एका पिशवीत ठेवण्यात आले होते. जी पिशवीच सापडत नाही आहे. हा सर्व प्रकार न रुचल्यामुळे सचिन यांनी पोलिसांना त्याची माहिती दिली. ज्यानंतर सुरु करण्यात आलेल्या तपासामध्ये सोलंकीनेच चोरी केल्याचं उघड झालं.