Bollywood Entertainment News : जागतिक स्तरावरही लोकप्रियता मिळवणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची नावं घेतली जातात. कलाजगतात मिळवलेल्या प्रसिद्धीसाठी आणि या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी कायमच चाहते त्यांचं कौतुक करताना दिसतात. पण, जेव्हाजेव्हा एखादा कलाकार प्रसिद्धीझोतात येतो तेव्हातेव्हा त्याला साथ देणारी प्रत्येक व्यक्ती या यशाची भागिदार असते. सेलिब्रिटंच्या बाबतीत त्यांच्या या यशाचे भागिदार ठरतात त्यांच्या सर्व व्यवस्थापनाचं काम पाहणारे त्यांचे मॅनेजर.
कामाच्या धर्तीवर होणारे करार, जाहिराती आणि जाहीर कार्यक्रमांमध्ये असणारी हजेरी इथपासून अगदी मुलाखती आणि व्यवहार या सर्वच बाबतीत कलाकारांसाठी त्यांचे मॅनेजर काम पाहतात. या कामासाठी त्यांना दणकट पगार मोजला जातो. शाहरुखच्या मॅनेजरचच उदाहरण घ्यायचं झालं, तर साधारण 2012 पासून पूजा ददलानी त्याच्यासाठी ही सर्व कामं पाहते.
शाहरुखची मॅनेजर म्हणून पूजा तिचं काम जबाबदारीनं पार पाडते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पूजाला तिच्या या कामासाठी एका वर्षाला जवळपास 7 ते 9 कोटी रुपये इतकं मानधन मिळतं. गेल्या काही वर्षांमध्ये शाहरुखच्या जीवनात पूजाही महत्त्वाची भूमिका निभावताना दिसते. पूजाच्या एकूण संपत्तीचा आकडा 45 ते 50 कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जातं.
शाहरुखप्रमाणंच अभिनेत्री प्रियांका चोप्रासुद्धा अंजुला अचारिया या तिच्या मॅनेजरसाठी घसघशीत पगार मोजते. प्रियांकाची ही मॅनेजर एका वर्षात 6 कोटी रुपये इतकी कमाई करते. याव्यतिरिक्त करीना कपूर खानची मॅनेजर असणाऱ्या पूनम दमानिया हिच्यासाठी अभिनेत्री एका वर्षात 3 कोटी रुपये मेजते. तर, रणवीर सिंगची मॅनेजर सूझान रॉड्रीग्ज त्याच्याकडून पगार म्हणून एका वर्षाला 2 कोटी रुपये घेते.
अभिनेता सलमान खानसोबत साधारण दशकभराच्या काळासाठी काम पाहणाऱ्या जॉर्डी पटेलसाठीही अभिनेता मोठी रक्कम आकारतो. त्याच्या एकूण संपत्तीचा आकडा 40 कोटी रुपये सांगितला जातो. भारतीय कलाजगतामध्ये सेलिब्रिटींचे मॅनेजरही त्यांच्या कारकिर्दीमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात. त्यांचे पगार वर्षाला किमान 1 ते 2 कोटींच्या घरात असतात. थक्क व्हाला होतंय ना पगाराचा आकडा पाहून?