पुलवामा हल्ल्यातील शहिदांना बॉलिवूड कलाकारांची अनोखी श्रद्धांजली

'तू देश मेरा...'

Updated: Aug 14, 2019, 07:16 PM IST
पुलवामा हल्ल्यातील शहिदांना बॉलिवूड कलाकारांची अनोखी श्रद्धांजली

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामात जवानांवर फेब्रुवारीमध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले. बॉलिवूड कलाकारांनी १५ ऑगस्टपूर्वी पुलवामा शहीदांना खास अंदाजात श्रद्धांजली वाहिली आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन, आमिर खान, टाइगर श्रॉफ, कार्तिक आर्यन आणि रणबीर कपूर शहीद जवानांना ट्रिब्यूट देण्यासाठी एकत्र आले आहेत.

बॉलिवूड कलाकारांनी मिळून पुलवामा शहीदांना देशभक्तीपर 'तू देश मेरा' हे गाणं समर्पित केलं आहे. स्वातंत्र्यदिवसाच्या एक दिवस आधी सीआरपीएफने ट्विटरवर या गाण्याचं पोस्टर शेअर केलं आहे. 

या खास गाण्यासाठी जावेद अली, जुबीन नौटियाल, शबाब साबरी आणि कबीर सिंह यांनी आवाज दिला आहे.