करिअरच्या सुरुवातीला सुत्रसंचालन करणारा अभिनेता आज बॉलिवूडचा 'किंग'

सोशल मीडियावर #1MomthforSRKDay ट्रेंड सुरू

Updated: Oct 4, 2019, 12:18 PM IST
करिअरच्या सुरुवातीला सुत्रसंचालन करणारा अभिनेता आज बॉलिवूडचा 'किंग'

मुंबई : स्वप्नपूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण कसोशीने प्रयत्न करत असतो. बॉलिवूडचा अभिनेता शाहरूख खानने देखील 'किंग खान' होण्यासाठी पुष्कळ मेहनत घेतली. एकेकाळी तो दूरर्शन वाहिनी करता सूत्रसंचालनाचं काम करत होता. सध्या अभिनयापासून ब्रेक घेतलेला शाहरूख सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सध्या त्याच्या करिअरच्या प्रवासातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये तो एका महिला सूत्रसंचालीकेसोबत स्टेज शेअर करताना दिसत आहे. 

करिअच्या सुरूवातीला शाहरूख दूरदर्शवर सूत्रसंचालनाचं काम करत होता. या व्हिडिओमध्ये तो गायक कुमार सानू यांच्याबद्दल जमलेल्या प्रेक्षकांना त्यांची ओळख करून देत असताना दिसत आहे. त्यानंतर कुमार सानू याचे स्टेजवर आगमन होताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.  

सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. पुढच्या महिन्यात शाहरूखचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर #1MomthforSRKDay ट्रेंड सुरू आहे. याच ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर शाहरूखचे जुने फोटो आणि व्हिडिओ ट्विटवर व्हायरल होत आहेत. 

अभिनायापासून दूर झाल्यानंतर त्याने आपला मोर्चा फिल्म मेकिंगकडे वळवला आहे. त्यामुळे शाहरूख त्याच्या वाढदिवसाच्या दिनी काही मोठी घोषणा करेल असा अंदाज त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.