सारा-कार्तिकच्या नात्याचा करण जोहरकडून मोठा खुलासा

सारा अली खान आजकाल तिच्या लव्ह लाईफबद्दलच्या चर्चा सार्वजनिकपणे होत असल्याने ती नाराज आहे

Updated: Jul 10, 2022, 09:08 PM IST
सारा-कार्तिकच्या नात्याचा करण जोहरकडून मोठा खुलासा  title=

मुंबई : सारा अली खान आजकाल तिच्या लव्ह लाईफबद्दलच्या चर्चा सार्वजनिकपणे होत असल्याने ती नाराज आहे आणि ती काहीही करू शकत नाही. हे प्रकरण कार्तिक आर्यनशी संबंधित आहे. लव्ह आज कल २ च्या शूटिंग दरम्यान सारा आणि कार्तिक डेट करत होते. पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं आणि दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे गेले. पण आताअचानक  प्रेमाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.

गेल्या महिन्यात एका पुरस्कार सोहळ्यात दोघंही आमने-सामने आले होते. या दोघांनी यावेळी एकमेकांसोबत फोटो काढले आणि नंतर कार्तिक-साराने एकत्र व्हिडिओही बनवला. दरम्यान, कार्तिक 'भूल भुलैया 2' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आणि अलीकडेच करण जोहरनेच्या 'कॉफी विथ करण' शोच्या प्रमोशनदरम्यान अशा काही गोष्टी बोलला, ज्यामुळे सारा अस्वस्थ झाली.

'भूल भुलैया 2'च्या प्रमोशन दरम्यान, जेव्हा आर्यनला विचारण्यात आलं की, लव्ह आज कल 2 च्या दरम्यान सारासोबतच्या त्याच्या प्रेमाच्या चर्चा हा चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग होता का? यावर आर्यन म्हणाला की, चित्रपटातील प्रत्येक गोष्ट प्रमोशनसाठी नसते.  आपणही माणसं आहोत आणि प्रत्येक गोष्टीचा खोटा प्रचार केला जात नाही.

आर्यनच्या या प्रामाणिक उत्तराचं सर्वत्र कौतुक झालं, पण वैयक्तिक बाब अशा प्रकारे बोलणे साराला योग्य वाटलं नाही. त्याच्या जवळच्या मित्रांच्या हवाल्याने मीडियामध्ये चर्चा होती की, आर्यनने भूल भुलैया 2 च्या प्रमोशनसाठी या गोष्टी बोलल्या आहेत.

करणकडून सिक्रेट्स ओपन
कार्तिक आणि साराने त्यांच्या अफेअरचा कधीच उघडपणे स्वीकार केला नसेल, पण नुकतंच करण जोहरने त्यांच्यात प्रेम असल्याचं स्पष्ट केलं. कॉफी विथ करणच्या नवीन सीझनबद्दल बोलताना तो एका मुलाखतीत म्हणाला की माझ्या शोच्या सोफ्यात काहीतरी खास आहे. इथे अनेक जोड्या बनवल्या गेल्या आहेत. 

कतरिना सोफ्यावर बसली आणि म्हणाली की तिला विकी कौशल आवडतो आणि आता बघा, आता त्यांचं लग्न झालं आहे. साराने येथे बसून कार्तिक आर्यनचं नाव घेतलं आणि ते एकमेकांना डेट करू लागले. आलिया भट्टने अनेकवेळा इथे बसून रणबीरचं नाव घेतलं आणि आज ते दोघंही पती-पत्नी आहेत. आता करणने आर्यनसोबतच्या डेटिंगचं गुपित उघड केल्याने सारा नाराज असल्याचं वृत्त आहे.