शरद केळकर का म्हणतोय, लोक मला चपल्लने मारतील?

शरद केळकरची ही बाजू प्रेक्षकांनी तशी कमीच पाहिली असेल.... पाहा काय घडतंय त्याच्या आयुष्यात

Updated: Apr 7, 2022, 09:56 AM IST
शरद केळकर का म्हणतोय, लोक मला चपल्लने मारतील?  title=
शरद केळकर

मुंबई : अभिनेता शरद केळकर हा त्याच्या दमदार भूमिकांसाठी आणि त्याहूनही त्याच्या भारदस्त आवाजासाठी ओळखला जातो. कला जगतामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शरदनं आजवर बहुविध भूमिका साकारल्या. पण, आता मात्र या अभिनेत्याचा एक भीती भेडसावत आहे. (sharad kelkar)

ही भीती नेमकी कसली? तर लोक आपल्याला चप्पलनं मारतील, असंच त्याला राहून राहून वाटत आहे. एकाएकी या अभिनेत्याला असं का वाटावं? हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना?

शरदनं आजवर काही चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या. पण, आता मात्र ‘ऑपरेशन रोमिओ’ या चित्रपटातून तो आतापर्यंचा सर्वात आव्हानात्मक आणि तितकीच नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे.

जवळपास दोन वर्षांनंतर आपला कोणता चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळं शरद फार उत्सुक आहे. चित्रपटाचं कथानक हे सर्वांना आपल्या जवळचं वाटेल असंच आहे, असं त्यानं माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं.

सदर चित्रपटातील काही दृश्य आपलं कसब पाहणारी होती, असं सांगताना मानसिकदृष्ट्याही ही भूमिका आपल्याला हादरवून गेली असं तो म्हणाला.

आपल्या मनातील भीती त्यानं पत्नीलाही बोलून दाखवली. हे पात्र काही मला आवडत नाहीये, असं तो म्हणाला. दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या कानावरही ही गोष्ट त्यानं घातली. ज्यानंतर त्याची ही अवस्था पाहून तू पात्राशी एकरुप झाला आहेस इतकंच ते म्हणाले.

लोक चप्पलने मारतील...

चित्रपटात असे काही डायलॉग्स आहेत जे पाहून महिला माझा तिरस्कार करु लागतील अशी भीती त्यानं व्यक्त केली. तुम्ही माझी परिस्थिती जाणून घ्या, मी एक पती आहे, 8 वर्षांच्या मुलीचा बाप आहे. खासगी आयुष्यात मी फारच कौटुंबिक व्यक्ती आहे, असं त्यानं सांगितली.

हे पात्र साकारताना मला किळस येत होता. मी स्वत:चाच राग करु लागलो होतो. तिथं घरी जाऊन पत्नी आणि मुलीशी नजर मिळवण्याचंही माझं धाडस नव्हतं. मला खात्री आहे, की चित्रपट पाहिल्यानंतर लोक मला चपलेनं मारतील. माझी प्रतीमा पूर्णपणे मलिन होईल, अशा शब्दांत शरदनं मनातील भीती बोलून दाखवली.