close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

स्त्रीरुपातील 'या' अभिनेत्याला ओळखलं का?

स्त्रीरुप भुलवी.... 

Updated: Aug 13, 2019, 09:26 AM IST
स्त्रीरुपातील 'या' अभिनेत्याला ओळखलं का?
ड्रीम गर्ल

मुंबई : पुरुष कलाकारांनी रुपेरी पडद्यावर स्त्रीपात्र साकारणं ही काही साधीसुधी आणि सोपी बाब नाही. आतापर्यंत बऱ्याच कलाकारांनी स्त्रीपात्र साकारण्याचं शिवधनुष्य उलचललं आहे. हे कलाकार यात यशस्वीसुद्धा ठरले आहेत. त्यातच आला नव्याने आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. ते नाव आहे राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवणाऱ्या अभिनेता आयुषमान खुराना याचं. 

कायमच चौकटीबाहेरच्या विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांमध्ये झळकणाऱ्या विकीने आणखी एका आव्हानात्मक आणि तितक्याच मनोरंजक भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं ठरवलं आहे. याचाच प्रत्यय देऊन गेला तो म्हणजे 'ड्रीम गर्ल' या त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर. 

आयुषमान खुराना, नुसरत भरुचा, अन्नू कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ड्रीम गर्ल या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ज्यामध्ये आयुषमान या राधा आणि सीतेच्या रुपात दिसत आहे. कुठे तो पूजा नावाच्या मुलीच्या आवाजात अनेकांशीच संवाद साधताना दिसत आहे, तर कुठे त्याच मुलीच्या नावाने आणि आवाजाच्या माध्यमाने अनेकांना घायाळ करत आहे. 

मुख्य म्हणजे फक्त दूरध्वनीच्याच माध्यमातून ही पूजा (आयुषमान) अनेकांनाच तिच्या प्रेमात पाडते. पण, आता नेमकं पुढे काय होणार आणि पूजाची खरी ओळख सर्वांना कळणार का याची उकल चित्रपटातून होणार असल्याचे संकेत या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. जवळपास अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अफलातून मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळत आहे. 

एकता कपूरच्या निर्मिमध्ये साकारणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन राज शांदिल्या यांनी केलं आहे. १३ सप्टेंबरला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी सज्ज असणार आहे. काय मग.... तुम्ही जाणार ना या 'पुजा'ला भेटायला?