रणवीरच्या एका चुकीमुळे खिलाडी कुमार असं काही म्हणाला की.....

रणवीरला याची शिक्षाही भोगावी लागली.... 

Updated: Mar 3, 2020, 02:07 PM IST
रणवीरच्या एका चुकीमुळे खिलाडी कुमार असं काही म्हणाला की.....  title=
रणवीर सिंग, अक्षय़ कुमार

मुंबई : रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ sooryavanshi या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला. या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात रणवीर सिंग, अक्षय कुमार, अजय देवगन, कतरिना कैफ आणि रोहित शेट्टीची उपस्थिती होती. असं असलं तरीही स्टारकास्टपैकी एक असणारा रणवीर मात्र कार्यक्रमासाठी खिलाडी कुमारच्या निशाण्यावर आलाच. 

अक्षयने रणवीरला त्याच्या चुकीसाठी शिक्षाही दिली. किंबहुना खुद्द रणवीरनेच ही शिक्षा देण्यापूर्वी आपलू चूक समजुन घेत शिक्षेची अंमलबजावणी सुरु केली. रणवीरने असं करण्याचं कारण म्हणजे या कार्यक्रमाला तो पाच- दहा नव्हे, तर तब्बल ४० मिनीटं उशीरा पोहोचला होता. 

पाहा : मुंबईवर होणाऱ्या हल्ल्यांशी अक्षय कुमार, अजय देवगनचं कनेक्शन

ट्रेलर लॉन्च सोहळ्यात सगळे कलाकार अगदी वेळेत हजेर होते मात्र चर्चा ठरली ती म्हणजे रणवीर सिंगची.यावेळी रणवीर ४० मिनीटं उशीरा पोहोचला. गंमतीची बाब म्हणजे तो उशीरा पोहचल्यामुळे खिलाडी कुमार आणि इतर कलाकारांनी मिळून त्याची फिरकी घेण्यास सुरुवात केली.

रणवीरला पाहताच सर्वांनी टाळ्या वाजवत त्याचं स्वागत केलं, हे पाहुन रणवीरनं अक्षय कुमारची माफी मागितली. यावर अक्षयनं हसतच 'चार-चार सिनीयर ऍक्टर्सको एक अकेले ज्युनियर ऍक्टर का इंतजार करना पडता है' असं विचारलं. ज्यावर रणवीरनं हसुन, 'सर मेरी वाईफ बाहर गई है', असं गंमतीशीर उत्तर दिलं. रणवीरचं हे उत्तर आणि कलाकारांचा हा धमाल अंदाज एका व्हिडिओतून पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा कलाकाराचं वेगळं रुप आणि ट्रेलर लॉन्च सोहळा किंवा चित्रपटाच्या प्रिमियरच्या वेळी घडणारे प्रसंगही सर्वांसमोर आले.