मुंबईवर होणाऱ्या हल्ल्यांशी अक्षय कुमार, अजय देवगनचं कनेक्शन

भारताचं नशीब कोण पालटणार ? 

Updated: Mar 2, 2020, 02:12 PM IST
मुंबईवर होणाऱ्या हल्ल्यांशी अक्षय कुमार, अजय देवगनचं कनेक्शन  title=
सूर्यवंशी

मुंबई : मायानगरी, स्वप्ननगरी अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या मुंबई या शहरावर आजवर अनेक दहशतवादी हल्ले झाले. दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर असणाऱ्या या शहराने वेळोवेळी या हल्ल्यांचा सामना करत पुन्हा पुन्हा जिद्दीने हे शहर उभं राहिलं. याच धाडसी वृत्तीची दादही दिली गेली. अशा या शहरावर होणाऱ्या हल्ल्याशी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार Akshay Kumar, अजय देवगन Ajay Devgn यांचं एक नातं आहे. 

मुंबईचे हल्ले आणि या बी- टाऊन सेलिब्रिटींचं नेमकं काय कनेक्शन, असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना?  फक्त खिलाडी कुमार आणि अजय देवगनच नव्हे, तर रणवीर सिंग, कतरिना कैफ यांचीही नावं याप्रकरणी पुढे येत आहेत. हल्ले, दहशतवाद, मुंबई आणि हे कलाकार; इथं काही बिनसलं तर नाही ना, अशी शंका तुमच्या मनात घर करण्यापूर्वी एक व्हिडिओ नक्की पाहा. 

हा व्हिडिओ आहे, रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनात साकारल्या गेलेल्या 'सूर्यवंशी' Sooryavanshi या चित्रपटाचा. 'बाजीराव सिंघम' म्हणजेच अजय देवगन, 'सिम्बा' म्हणजेच रणवीर सिंग या दोघांसह खुद्द खिलाडी कुमारही या चित्रपटाच्या निमित्ताने पोलिसांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबईवर झालेले दहशतवादी हल्ले आणि येत्या काळातही संभाव्य हल्ले  पाहता एक परिपूर्ण असा 'एंटरटेनर' चित्रपटच 'सूर्यवंशी'च्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. 

पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ

मुंबईच्या संरक्षणार्थ सदैव तत्पर असणाऱ्या आणि जातपात, धर्म- पंथ अशा कोणताही फरक न करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या कामाला या चित्रपटाच्या निमित्ताने सलाम केलं जाणार आहे. ज्याची एक झलक ट्रेलरमध्येही पाहायला मिळत आहे. अक्षय, अजय आणि रणवीर यांच्यासोबतच कतरीना कैफ हिसुद्धा चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. २४ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेव्हा या डॅशिंग पोलिसांची भेट घेण्यासाठी तुम्ही सज्ज आहात ना?