25 मुलं एकट्या राजकुमार रावशी भिडली आणि.... ; पुढे काय झालं पाहा....

राजकुमार रावची तुलना बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये केली जाते.

Updated: Aug 31, 2021, 04:22 PM IST
25 मुलं एकट्या राजकुमार रावशी भिडली आणि.... ; पुढे काय झालं पाहा.... title=

मुंबई : राजकुमार रावची तुलना बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये केली जाते.  नुकताच राजकुमार रावने आपला ३७वा वाढदिवस साजरा केला आहे. या निमित्ताने त्याच्याशी संबंधित एक रोचक कथा व्हायरल होत आहे. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा राजकुमार रावची एंट्री बॉलिवूडमध्ये झाली नव्हती. आणि गुडगावमध्ये काही मुलांनी त्याला मारहाण केली होती.

या घटनेचा उल्लेख राजकुमार रावने तीन वर्षांपूर्वी  'EIC vs Bollywood' या शोमध्ये केला होता. ही घटना त्याच्या कॉलेजच्या दिवसांमधली आहे. यामध्ये त्याने सांगितले की, त्याला अभिनेता व्हायचं होतं. तो म्हणाला की, जेव्हा 25 जाट मुलं त्याला मारत होती, तेव्हा तो त्यांना एकचं सांगत होता की, चेहऱ्यावर मारू नका, मला अभिनेता व्हायचं आहे.

या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्याने सांगितलं होतं की, तो लहानपणी गुंडासारखा होता. अकरावीत त्याने अभिनयात करिअर करण्याचं ठरवलं. या दरम्यान, एका मुलीला बास्केटबॉल खेळताना पाहून तो तिच्या प्रेमात पडला. त्या मुलीचा संदर्भ देत तो म्हणाला की, ती कोणत्याही सामान्य मुलीसारखी नव्हती. ती शाहरुख खानच्या 'कुछ कुछ होता है' चित्रपटातील अंजलीसारखी होती. राजकुमार देखील शाहरुख खानचा चाहता होता. याच शोच्या सुरुवातीच्या भागात राजकुमार रावने या घटनेचा उल्लेख केला आहे.

राजकुमार राव म्हणाला, “मी गुडगावच्या मॉडर्न फॅन्सी ब्लू बेल्स शाळेत शिकण्यासाठी गेलो होतो. मी त्यावेळी लहान होतो. तेव्हापासून मी शाहरुख खानचा मोठा चाहता आहे. त्यामुळे 'कुछ कुछ होता है' माझ्या मनावर पूर्णपणे अधिराज्य गाजवलं. त्याच शाळेत मला एक मुलगी बास्केटबॉल खेळताना दिसली. ती मुलगी पूर्णपणे काजोल म्हणजेच अंजलीसारखी दिसत होती. मग आम्ही कसं तरी एकमेकांना डेट करू लागलो, पण तिचा आधीच बॉयफ्रेंड होता. "

त्याने पुढे सांगितलं की, जेव्हा मुलीच्या बॉयफ्रेंडला याची माहिती मिळाली तेव्हा तो लॉकॉलेजमध्ये 25 मुलांना मारण्यासाठी घेवून आला. राजकुमार रावच्यामते, तोपर्यं तो साधा सरळ  झाला होता आणि त्याने विचार केला होता की,  आता तो कोणाशी मारामारी करणार नाही. तो म्हणाला, “25 मुले मला मारत होती. ते आपापसात बोलत होते की, त्यांनी चाकू बाहेर काढला, गोळ्या झाडल्या. मी गप्प बसलो.

माझ्याबरोबर माझे दोन पंजाबी मित्र होते जे म्हणत होते की, त्याला मारू नका, तुम्हाला  हवं असल्यास तुम्ही मला मारा. मी या प्रकरणा दरम्यान फक्त एकच गोष्ट सांगत होतो. मला चेहऱ्यावर मारू नका, मला अभिनेता व्हायचं आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण ही एक सत्य घटना आहे,"

2010 मध्ये लव्ह सेक्स धोका या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारा राजकुमार राव गँग्स ऑफ वासेपूर, शाहिद, सिटीलाइट्स, अलीगढ, न्यूटन सारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे.