'आरएसएस'च शिवाजी, अशोकापासून अनेकांचा मारेकरी; बॉलिवूड गायिकेचं वादग्रस्त वक्तव्य

तिच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. 

Updated: Jun 20, 2019, 04:31 PM IST
'आरएसएस'च शिवाजी, अशोकापासून अनेकांचा मारेकरी; बॉलिवूड गायिकेचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : बॉलिवूडमध्ये गायिका आणि रॅपर म्हणून स्वत:ची ओळख प्रस्थापित करणारी हार्ड कौर वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्याविषयी तिने वादग्रस्त विधान केलं आहे. ज्यानंतर तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलही करण्यात आलं. 

आरएसएसच्या प्रमुखपदी असणाऱ्य़ा मोहन भागवत यांना जातीयवादाचं राजकारण भडकवणारी व्यक्ती म्हणत तिने २६ / ११च्या दहशतवदी हल्ल्यासाठीही त्यांनाच दोषी ठरवलं. २६/ ११ चा दहशतवादी हल्ला असो किंवा मग पुलवामा हल्ला. साऱ्या प्रश्नांची पाळंमुळं इथूनच आहे, असं ती या पोस्टमध्ये म्हणाली. तर, आणखी एका पोस्टमध्ये तिने Who killed Karkare? असं शीर्षक असणाऱ्या पुस्तकाचं मुखपृष्ठ पोस्ट केलं. हे सारं काही आरएसएसनेच केलं आहे, असं तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. 

Hard Kaur bollywood

RSS CHIEF

इतक्यावरच न थांबता तिने गौरी लंकेश हत्येप्रकरणीही एक विधान केलं. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांविषयीही तिने थेट शब्दांमध्ये टीका केल्याचं पाहायला मिळालं. ‘जागे व्हा, तुम्ही तुमच्या बहीणींवर, मुलींवर बलात्कार होण्याची वाट पाहात आहात का? की त्यांनी तुमच्यावर हल्ला करण्यासाठी तुम्ही थांबलेले आहात?,’ असा वादग्रस्त प्रश्न तिने या पोस्टमधून विचारला. 

yogi adityanath

सोशल मीडियावरील तिच्या पोस्ट पाहता परखडपणे आपल्या भूमिका मांडण्याचा तिला फटका बसला असल्याचं कळत आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलमांनुसार तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाराणासी स्थित वकील शशांक शेखर यांनी तिच्यावर १२४ A, १५३, ५००, ५०५ आणि ६६ आयटी या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वादग्रस्त पोस्टमुळे प्रकाशझोतात येण्याची तिची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीची ती विविध कारणांनी चर्चेत आली होती.