सलमानच्या भाचीच्या ग्लॅमरस अदा पाहून म्हणाल तौबा तौबा...

बॉलिवूड सौंदर्यवतींना मागे टाकतोय हा चेहरा... 

Updated: Sep 17, 2021, 09:22 AM IST
सलमानच्या भाचीच्या ग्लॅमरस अदा पाहून म्हणाल तौबा तौबा...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सेलिब्रिटी चर्चेत येण्यासोबतच त्यांचे कुटुंबीयही ओघाओघाने माध्यमांचं लक्ष वेधतात. त्यातच काही सेलिब्रिटी कुटुंबांच्या विशेष चर्चा होतात. त्यामागे कितीही कारणं असली तरीही ही सेलिब्रिटी कुटुंब आहेत हे एकच मुख्य कारण पुरेसं ठरतं. सध्या अशा एका सेलिब्रिटी कुटुंबातील एक नाव समोर आलं आहे. 

हे नाव आहे अभिनेता सलमान खान याची भाची, अलिजे अग्निहोत्री हिचं. सूत्रांच्या माहितीनुसार अलिजे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सलमानची बहीण, अलविरा अग्निहोत्री हिची मुलगी अलिजे. अलिजेचे वडील, अतुल अग्निहोत्री बॉलिवूडमधील काही प्रथितयश नावांपैकी एक. 

अलिजे अनेकदा सलमानसोबत कॅमेरासमोर आली आहे. प्रत्येक वेळी अलिजेनं तिच्या सौंदर्यानं अनेकांनाच घायाळ केलं आहे. इतकंच नव्हे, तर तिच्या सौंदर्याची तुलना बऱ्याचदा अभिनेत्री कतरिना कैफ हिच्याशी केली जाते. पण, तिचं सौंदर्य पाहता, कतरिनालाहीही सलमानची भाची मागे टाकेल असंच अनेकांचं मत. 

असल जिंदगी में कैटरीना कैफ से भी ज्यादा Hot हैं सलमान खान की भांजी अलिजे अग्निहोत्री

असल जिंदगी में कैटरीना कैफ से भी ज्यादा Hot हैं सलमान खान की भांजी अलिजे अग्निहोत्री

अलिजेनं नुकतंच एका जाहिरातीसाठी चित्रीकरण केलं. ही जाहिरात कमालीची व्हायरलही झाली. असं असलं तरीही अलिजे मात्र सोशल मीडियापासून काहीशी दूर आणि कमी सक्रिय असल्यामुळं तिला आतापासूनच फॉलो करणाऱ्यांना मात्र काही अडचणींचा सामना करावा लागत आहे.