दीपिका- रणवीरच्या लेकीला भेटण्यासाठी आला खास पाहुणा; मुंबईच्या रस्त्यावर धावलेली ती रोल्स रॉयस कुणाची?

Deepika Padukone and Ranveer Singh Daughter : दीपवीरच्या लेकीला भेटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर रात्री उशिरा रोल्स रॉयसमधून कोण आलं? पाहणारे पाहतच राहिले...   

सायली पाटील | Updated: Sep 13, 2024, 10:16 AM IST
दीपिका- रणवीरच्या लेकीला भेटण्यासाठी आला खास पाहुणा; मुंबईच्या रस्त्यावर धावलेली ती रोल्स रॉयस कुणाची?  title=
Bollywood Shah Rukh Khan visits new parents Deepika Padukone and Ranveer Singh at Mumbai hospital

Deepika Padukone and Ranveer Singh Daughter : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी 8 सप्टेंबर रोजी गोंडस मुलीचं स्वागत केलं. अभिनेत्रीनं लेकीला जन्म देताच इथं कलाजगतापासून चाहत्यांपर्यंत सर्वांनीच या सेलिब्रिटी जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असणारी ही जोडी सध्या जीवनातील अतिशय खास आणि तितक्याच सुखद क्षणांचा अनुभव घेत असताना आता त्यांचा मित्रपरिवारही व्यक्तिश: त्यांची भेट घेत या आनंदाचे साक्षीदार होताना दिसत आहे. 

दीपवीरच्या याच मित्रपरिवारातील एका खास व्यक्तीनं नुकतीच थेट रुग्णालयात जाऊन अभिनेत्रीची आणि तिच्या लेकीची भेट घेतली. रात्री उशिरा मुंबईच्या रस्त्यांवरून आलिशान अशा रोल्स रॉयस कारमधून या व्यक्तीनं HN Reliance Hospital गाठलं आणि रस्त्यावरून येणारे- जाणारे या कारकडे पाहतच राहिले. 

गुरुवारी रात्री उशिरा दीपिकाची भेट घेण्यासाठी पोहोचलेली ही व्यक्ती दुसरीतिसरी कोणी नसून हा आहे तिचा खास मित्र, अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan). शाहरुखचीच कार, रात्री उशिरा रुग्णालयात जाताना आणि तिथून बाहेर येताना दिसली आणि पापाराझींनी इथंही क्षणाचा विलंब न लावता किंग खानच्या कारची झलक टीपली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

हेसुद्धा वाचा : 44 व्या वर्षीही करीना बोटॉक्स, सर्जरीपासून दूर; सैफचं नाव पुढे करत सांगितलं सिक्रेट...

 

सूत्रांच्या माहितीनुसार नुकतेच पालक झालेल्या दीपिका आणि रणवीरला शाहरुखनं या भेटीदरम्यान शुभेच्छा दिल्या, त्यांच्या लेकिची भेटही घेतली. दरम्यान, त्याच्या कारचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले असले तरीही किंग खानचे या भेटीदरम्यानचे फोटो मात्र अद्याप समोर आलेले नाहीत. 

नवी जबाबदारी... सारं नवं 

2018 मध्ये दीपिका आणि रणवीर लग्नबंधनात अडकले होते. यंदाच्याच वर्षी म्हणजेच 2024 च्या फेब्रुवारी महिन्यात या सेलिब्रिटी जोडीनं त्यांच्या नात्यात बाळाची चाहूल लागल्याची गोड बातमी जाहीर केली होती. ज्यानंतर आता सप्टेंबर महिन्ययात दीपिकानं मुलीला जन्म दिला आणि संपूर्ण बॉलिवूडनं तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. लेकीच्या जन्मानंतर दीपिका आणि रणवीर नव्या घरात वास्तव्यास जाणार असून, इथं ते एका नव्या जबबादारीसह नव्या जीवनाची सुरुवात करणार आहेत.