Pornography Case: राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, Ex employees कडून 'ती' गुपितं उघडकीस

पाहता पाहता या प्रकरणाला दर दिवशी नवी पाळंमुळं फुटत गेली. 

Updated: Aug 6, 2021, 07:57 PM IST
Pornography Case: राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, Ex employees कडून 'ती' गुपितं उघडकीस
राज कुंद्रा

Pornography Case : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) हिचा पती, राज कुंद्रा ( raj kundra) याचं नाव पोर्नोग्राफी केसमध्ये समोर आलं आणि पाहता पाहता या प्रकरणाला दर दिवशी नवी पाळंमुळं फुटत गेली. कुंद्राच्या अडचणी दिवसागणिक वाढत चालल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. त्यातच आता, त्याच्या विआन कंपनीतील चार जुन्या कर्मचाऱ्यांनी राज कुंद्राविरोधात जबाब नोंदवल्याचं कळत आहे. 

माजी कर्मचाऱ्यांच्या जबाबामुळं आता या प्रकरणाला नवं वळण मिळाल्याचं म्हटलं जात आहे. गुन्हे शाखा अर्थात क्राईम ब्रांचच्या हवाल्यानं समोर आलेल्या वृत्तानुसार राज कुंद्राच्या कंपनीत काम करणाऱ्या माजी कर्मचाऱ्यांनी न्यायालयापुढं त्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्यांच्या जबाबामुळं तपास यंत्रणांना मोठी मदतही होत आहे. 

राज कुंद्राविरोधात चार्टर्ड अकाऊंटंटचा जबाब 
सूत्रांच्या माहितीनुसार राज कुंद्राविरोधात जबाब नोंदवणारा पहिला साक्षीदार हा चार्टर्ड अकाऊंटंट आहे. या साक्षीदाराकडून बॅलेंस शीटशी संबंधित माहिती समोर आली आहे. पैशांच्या व्यवहाराची माहितीती हळुहळू समोर येत आहे, ज्यामुळं मुंबई पोलिसांनाही मदत मिळू लागली आहे. दुसरा साक्षीदार हा फायनांस ऑफिसर आहे. ज्यानं मनी ट्रायलसंदर्भात माहिती दिल्याचं कळत आहे. तर, उर्वरित दोन साक्षीदार हे टेक्निकल फिल्डचा असून, टेक्निकल सपोर्ट, अॅप मेंटेनंस, डाटा डिलीट आणि इतर माहिती त्यांच्याकडून मिळाल्याचं कळत आहे. 

'फिल्म इंडस्ट्रीत मुलींनाच नाही, मुलांनाही करावा लागतो कास्टिंग काऊचचा सामना'

 

राज कुंद्राविरोधात या चौघांनीही अतिशय महत्त्वाची माहिती दिली असून, त्यांची ही साक्ष राज कुंद्राची बाजू आणखी कमकुवत करु शकते असंही म्हटलं जात आहे.