मुंबई : कोरोना पीडित बॉलिवूड गायिका कनिका कपूरची पहिल्यांदा चाचणी निगेटिव्ह आली आहे. ३६ तासानंतर कनिकाची पुन्हा एकदा चाचणी होणार आहे. जर ही चाचणी निगेटिव्ह आली तर तिला घरी सोडण्यात येणार आहे. २० मार्चपासून कनिका एसजीपीजीआय रूग्णालयात उपचार घेत आहे. दर दोन दिवसाआड तिची तपासणी करण्यात येत आहे. शनिवारी पहिल्यांदाच चाचणी ही निगेटीव आली आहे. एवढंच नव्हे तर कनिका ज्या रूग्णालयात दाखल आहे तेथील सात कर्मचाऱ्यांच्या चाचण्या देखील पॉझिटिव्ह आल्या आहेत.
तिच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या लखनऊमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या स्थितीत सुधारणा होत असल्याचं सांगितलं जात आहे. कनिका कपूर सध्या संजय गांधी पोस्ट ग्रेजुएट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेजमध्ये आहे.
Bollywood singer Kanika Kapoor's fifth #COVID19 test result comes negative. However, she will have to stay at PGI Hospital Lucknow until one more test result comes as negative. (file pic) pic.twitter.com/BEJevytlOj
— ANI (@ANI) April 4, 2020
कनिकाची पाचवी चाचणी देखील पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिच्यामध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं नसल्याचं सांगितले आहे. त्यानंतर आता कुटुंबीय तिच्या साहव्या चाचणीची प्रतिक्षा करत होते, असं सांगण्यात येत आहे.
शिवाय, रुग्णालयात तिच्या वागणुकीवर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. याबाबत तिच्या कुटुंबीयांनी धक्कादायक खुलासा केला आहे. रुग्णालयात कनिकाला पडद्यांच्या आत कपडे बदलायला सांगितले होते, असं वक्तव्य तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.