Manish malhotra Birthday Bash : सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या (Manish malhotra ) वाढदिवसानिमित्त एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पार्टीला मनिषचा मित्रपरिवार आवर्जून हजर राहिला होता. वरूण धवनपासून (Varun Dhavan) अगदी शाहरुखच्या पत्नीपर्यंत म्हणजेच गौरी खानपर्यंत (Gauri khan) अनेकणांची उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली. या पार्टीच्या निमित्तानं येणाऱ्या सेलिब्रिटींची एक झलक टीपण्यासाठी छायाचित्रकारांनीही गर्दी केली होती.
कलाकारांचे स्टाईल स्टेटमेंट, त्यांचे पार्टी आऊटफिट आणि Million Dollar आत्मविश्वास हे सर्वकाही या पार्टीत पाहायला मिळालं. पण, सर्व पार्टी इतकंच काय उत्सवमूर्ती मनिष मल्होत्राही राहिला बाजूला, सर्वांच्या नजरा भलत्याच गोष्टीवर खिळल्या.
ही भलतीच गोष्ट यासाठी, कारण आतापर्यंत फार क्वचितच असं काहीतरी छायाचित्रकारांनी आणि पर्यायी चाहत्यांनी पाहिलेलं. त्याचं झालं असं, की पार्टीसाठी बी टाऊनची प्रसिद्ध गर्ल गँग, म्हणजेच (Malaika Arora, Amrita Arora, karishma kapoor, Kareena Kapoor) मलायका अरोरा, अमृता अरोरा, करीना कपूर आणि करिष्मा कपूर या चौघीही आल्या आणि एकत्रच फोटोसाठी उभ्या राहिल्या.
इथपर्यंत सर्वकाही व्यवस्थित सुरु होतं. पण, फोटोसाठी पोझ देतेवेळीच करिष्मा कपूर आणि तिची बहीण करीना यांच्या चेहऱ्यावर असणारे हावभाव काही वेगळंच सांगून गेले. पार्टीसाठी आल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यांवर होता पण, एकमेकींशेजारी उभं राहूनही त्या दोघीही क्षणात गंभीर झाल्या.
आपल्यासमोर paparazzi असल्याचं पाहून त्यांनी ती वेळ मारुन नेण्याचाही प्रयत्न केला. पण, त्यातच करिष्मा करिनाकडे पाठ करून उभी राहिली आणि या चर्चांना आणखी वाव मिळाला. कारण दोघींच्या डोळ्यातून खूप गोष्टी नकळतच व्यक्त होत होत्या. आता या दोघांच्या नात्यात खरंच वादाची ठिणगी पडलीये का आणि पडलीही असेल तर त्यामागचं कारण काय हेच प्रश्न चाहते, नेटकरी उपस्थित करताना दिसत आहेत.