अनुष्का शर्माच्या 'परी' सिनेमा सेटवर दुर्घटना, एक ठार

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या आगामी सिनेमाच्या सेटवर अपघात झाला. सेटवर एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे सेटवरील वातावरणाला गालबोट लागले आहे. 'परी' या सिनेमाच्या सेटवर एका प्रकाशयोजना तंत्रज्ञाचा मृत्यू झाला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 31, 2017, 12:49 PM IST
अनुष्का शर्माच्या 'परी' सिनेमा सेटवर दुर्घटना, एक ठार title=

कोलकाता : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या आगामी सिनेमाच्या सेटवर अपघात झाला. सेटवर एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे सेटवरील वातावरणाला गालबोट लागले आहे. 'परी' या सिनेमाच्या सेटवर एका प्रकाशयोजना तंत्रज्ञाचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी शहाबे आलम नावाच्या या तंत्रज्ञाचा वीजेच्या तारेच्या संपर्कात आल्यामुळे शॉक लागून सेटवरच मृत्यू झाला. क्लिन स्लेट फिल्म्स ही निर्मिती संस्था अनुष्का शर्माची असून, कर्णेश शर्मा यामध्ये तिचे भागीदार आहेत. दरम्यान, मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी चित्रपटाची टीम पुढे सरसावली आहे.

दरम्यान, काल एका दुर्दैवी घटनेमध्ये आमच्या सेटवरील प्रकाश योजना विभागामध्ये काम करणाऱ्या शहाबे आलम नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय.  बरेच प्रयत्न करुनही आम्ही त्यांचे प्राण वाचवू शकलो नाही. आम्ही त्याच्या कुटुंबियांशी अंत्यसंस्कारासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. या कठिण प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी आहोत, असे 'क्लिन स्लेट' फिल्म्सच्या कर्णेश शर्मा यांनी एका पत्रकात म्हटलेय.