हिंदी सिनेमाचे ''हीमॅन'' Dharmendra यांनी गुपचूप एसटीच्या छतावर बसून प्रवास का केला...

हिंदी सिनेमाचे 'हिमॅन' धर्मेंद्र यांना लहानपणापासूनच चित्रपट पाहण्याची आवड होती...

Updated: May 18, 2021, 02:52 PM IST
हिंदी सिनेमाचे ''हीमॅन'' Dharmendra यांनी गुपचूप एसटीच्या छतावर बसून प्रवास का केला...

मुंबई : हिंदी सिनेमाचे 'हिमॅन' धर्मेंद्र यांना लहानपणापासूनच चित्रपट पाहण्याची आवड होती. मात्र, धर्मेंद्र यांचे चित्रपट पाहणे त्यांच्या वडिलांना आवडायचं नाही. मीडिया रिपोर्टनुसार बातमी त्या दिवसांची आहे जेव्हा धर्मेंद्र फगवाडा मधील कॉलेजमध्ये शिकत होते, जेव्हा ते जालंधरला जायचे आणि सिनेमा बघायचे. धर्मेंद्र फागवाडा मधून जालंधरला जायचे आणि चित्रपट पाहिल्यानंतर शेवटची बस पकडून घरी परत यायचे.

जालंधरहून शेवटची बस अशा वेळी सुटायची की, धर्मेंद्र यांना सिनेमाचा शेवट सोडावा लागत असे. एकदा धर्मेंद्र चित्रपटाचा शेवटचा भाग सोडून बस पकडण्यासाठी पोहोचले, हा किस्सा थंडीतल्या दिवसांमधील आहे. त्यावेळी बसचे कंडक्टर लुधियानाला जात होते. कारण बसचा शेवटचा लुधियानाच होता.

धर्मेंद्र यांनी कंडक्टरला सांगितलं की, 'मला जालंधरला जायचं आहे'. हे ऐकून कंडक्टर म्हणाले - 'घाई करू नकोस, आधी लुधियाच्या लोकांना बसमध्ये चढू दे, जागा राहिली तर मी तुला एक सीट देतो'.

धर्मेंद्र यांना भीती होती की, ही शेवटची बस सूटली तर, माझ्या वडिलांना कळेल की मी चित्रपट बघायला जातो. या कारणामुळे, धर्मेंद्र यांनी कंडक्टरला वारंवार विनंती करायला सुरवात केली, मात्र कडंक्टर ऐकलेच नाही. बस सुरु झाली. हे बघताच धर्मेंद्र बसच्या पाठीमागच्या शिडीकडे पळून गेले आणि छतावर चढले.

धर्मेंद्र बसच्या छतावर बसले होते पण थंडीमुळे त्यांचं आईस्क्रिम झालं. कंडक्टरने धर्मेंद्र यांना बसच्या छतावरुन खाली उतरताना पाहिलं. तेव्हा तो कंडक्टर फार चिडला. धर्मेंद्रला पकडण्यासाठी ते त्याच्यामागे पळाले पण धर्मेद्र यांना पकडता कंडक्टला आलच नाही. अशाप्रकारे धर्मेंद्र यांनी बाबांचा ओरडा खाण्यापासून स्वत:ला वाचवलं आणि घरी पोहचले.