Bollywood Cat Fights: फक्त कंगना-आलिया नाही, तर या अभिनेत्रीमध्ये जोरदार जुंपली

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची मैत्री आणि दुश्मनी या दोन्ही गोष्टी प्रसिद्ध आहेत.

Updated: Oct 1, 2021, 07:04 AM IST
Bollywood Cat Fights: फक्त कंगना-आलिया नाही, तर या अभिनेत्रीमध्ये जोरदार जुंपली title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची मैत्री आणि दुश्मनी या दोन्ही गोष्टी प्रसिद्ध आहेत. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या नेहमी एकत्र हँग आउट करताना दिसतात. तर ईथे, अनेक अभिनेत्री ज्यांनी एकत्र काम केलं आणि दोघांचं वैर झालं. असंही काही लोकं आहेत. ज्यांच्यामध्ये एकत्र काम न करताही मारामारी आणि दुरावा होता. हे कॅटफाईट बॉलिवूडमध्ये खूप लोकप्रिय आहेत. बऱ्याचवेळा ते माध्यमांमध्ये एकमेकांसमोर उघडपणे बोलतात तर काहीवेळा न बोलता प्रत्येकाला त्यांच्यातील भांडणाची माहिती असते. ईथे आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती सतत हेडलाईन्समध्ये होती. अंकिताने सुशांत सिंह राजपूतबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. ज्यामुळे रियाला राग आला. अगदी रिया चक्रवर्तीने तर अगदी सांगितलं होतं की, अंकिता सुशांतची विधवा असल्यासारखी वागत आहे. 

कॉपी विथ करणमध्ये करीना कपूरने प्रियांका चोप्राच्या उच्चारांवर कमेंट केली आणि तिला फेक म्हटलं. त्यानंतर त्यांचे संबंध बिघडले. याशिवाय, 'ऐतराज' चित्रपटादरम्यान नकारात्मक पात्र साकारल्याबद्दल प्रियांका चोप्राचीही प्रशंसा झाली. तेव्हापासून असं म्हटलं जातं की, प्रियांका-करीनाचे संबंध चांगले नाहीत. नंतर या दोघीही जुन्या सगळ्या गोष्टींना विसरल्या आणि कॉफी विथ करणमध्ये एकत्र दिसल्या.

कंगना रानौतने अनेकवेळा आलिया भट्टवर हल्ला केला आहे. वास्तविक, राझी रिलीज झाल्यानंतर कंगनाने आलियाची प्रशंसा केली पण आलिया कंगनाच्या चित्रपटाबद्दल काहीच बोलली नाही. कंगना म्हणाली होती की, लोकं आलियाला लहान म्हणतात तर आईचं लग्न आलियाच्या वयात झालं होतं. त्याचवेळी आलिया म्हणाली होती की ती कंगनाच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत नाही कारण जगातील बरेच लोक त्यांचं मत व्यक्त करतात.

दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांच्यात कॅट फाईटचं खरं कारण तर रणबीर कपूर आहे. दीपिका रणबीर कपूरला डेट करायची पण रणबीरने तिच्याशी संबंध तोडले आणि कतरिनासोबत नातेसंबंध जोडले. यानंतर कतरिना आणि दीपिकाचे संबंध बिघडले. मात्र, नंतर दोघीही सोशल मीडियावर एकमेकांसाठी खास कमेंट करताना दिसतात.