अभिनेत्रीने यामी गौतमने का नेसली लग्नात आईची साडी? अखेर सत्य समोर

आपल्या लग्नात आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते.

Updated: Apr 8, 2022, 06:27 PM IST
अभिनेत्रीने यामी गौतमने का नेसली लग्नात आईची साडी? अखेर सत्य समोर title=

मुंबई : लग्न एक गोष्ट आहे... जी प्रत्येकाच्या आयुष्यात खास असते. लग्न झालं की आपण एका नव्या आयुष्याच्या आनंद घेत असतो. आपल्या लग्नात आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण अभिनेत्री यामी गौतमबद्दल असं घडलं नाही. नुकतचं एका मुलाखतीमध्ये तिने लग्नातील धक्कादायक किस्सा आणि आईची साडी का नेसली यावर खुलासा केला.

यामी म्हणाली, 'माझे लग्न हे माझ्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब दर्शवते. मी स्वत:ला फार भाग्यवान समजते की मला माझ्यासारखा विचार करणारा जोडीदार मिळाला आहे. लग्नाचा दिवस हा आपला असतो... त्यामुळे एक वेगळा आनंद असतो.'

ती पुढे म्हणाली, 'एका डिझायनरने माझ्यासोबत भेदभाव केला. लग्नात तिने मला लेहेंगा देण्यास नकार दिला.. तेव्हा मला वाईट वाटलं. तिने मला लेंहगा दिला नाही, कारण तिला असं वाटत होतं की, मी तिच्या लेंहग्यासाठी पात्र नाही.'

घडल्या प्रकरणानंतर यामीला वाईट वाटलं आणि ती म्हणाली, 'इतका वाईट व्यवहार कोण करू शकतं. तेव्हा मी ठरवलं त्या डिझायनरसोबत मी कधीचं काम नाही करणार...'

यामीबद्दल सांगायचं झालं तर, ती सध्या 'दसवी' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात ती पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. सिनेमात तिच्यासोबत अभिनता अभिषेक देखील मुख्य भूमिकेत दिसत आहे.