नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता आणि नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पद्मावती चित्रपटाच्या वादात उडी घेतली आहे.. या वादावर अमिताभ बच्चन, आमिर खान, शाहरुख खान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी का गप्प आहे असा सवाल सिन्हा यांनी उपस्थित केला आहे.
शत्रुध्न सिन्हा यांनी या संदर्भात ट्विट करून आपला संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, पद्मावती एक ज्वलंत मुद्दा बनला आहे. लोक विचारत आहे की महान अभिनेता अमिताभ बच्चन, सर्वात गुणी अभिनेता आमिर खान आणि सर्वात लोकप्रिय अभिनेता शाहरूख यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. तसेच आपले सूचना आणि प्रसारण मंत्री आणि सर्वात लोकप्रिय माननीय पंतप्रधान या प्रकरणी गप्प आहेत.
As Padmavati becomes a burning controversy, people are asking why the legendary @SrBachchan, most versatile @aamir_khan & most popular @iamsrk have no comments..& how come our I&B Minister or our most popular Hon'ble PM (according to PEW) are maintaining stoic silence. High time!
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) November 22, 2017
As for me, I would & should speak on Padmavati issue only after the "great filmmaker, producer S.L.Bhansali" speaks up. I speak only when I am spoken to & I will speak keeping in mind the interests of the filmmaker as well as the sensitivity, valour, loyalty of the great Rajputs.
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) November 22, 2017
ते म्हणाले, या प्रकरणात चित्रपट निर्माते संजय लीला भंसाळीचे हित आणि राजपूत समाजाची संवेदनशीलता लक्षात घेऊन मी कोणतेही वक्तव्य करणार आहे. त्यांनी सांगितले की, माझ्याबाबतीत बोलायचे झाले तर सर्वात प्रथम मी संजय लीला भंसाळी यांच्याशी बोलून आणि मग या विषयी बोलले पाहिजे. या संदर्भात मी चित्रपट निर्मात्याचे हित लक्षात घेण्याबरोबरच महान राजपूत समाजाची संवेदनशीलता, वीरता आणि इमानदारीला लक्षात घेऊन बोलणार आहे.
पद्मावती चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण हीने राणी पद्मावतीची भूमिका केली आहे. यात अभिनेता रणवीर सिंग याने अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका केली आहे. भंसाळी यांच्यानुसार राजपूत राणी पद्मावती यांच्या वीरतेला श्रद्धांजली देण्यासाठी हा चित्रपट काढला आहे.
या चित्रपटाला राजस्थानातील कर्णी सेनाने विरोध केला आहे. तसेच एका भाजप नेत्याने भंसाळी आणि दीपिकाचा शिरच्छेद करणाऱ्याला १० कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड केल्याचा आरोप भंसाळी यांच्यावर लावण्यात आला आहे. हा चित्रपट १ डिसेंबर रोजी रिलीज करण्यात येणार होता. पण आता त्याची रिलीज डेट पुढे ढकलली आहे.