close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अर्जुन - मलायकाच्या लग्नावर बोनी कपूरचे वक्तव्य

बॉलिवूडमधील मोस्ट पॉप्यूलर कपलच्या यादीत या जोडप्याचा अव्वल क्रमांक लागतो.

Updated: Mar 29, 2019, 11:44 AM IST
अर्जुन - मलायकाच्या लग्नावर बोनी कपूरचे वक्तव्य

मुंबई : बॉलिवूडमध्ये सतत कोणत्यातरी चर्चेला उधान आलेले असते. सध्या बॉलिवूडमध्ये अर्जुन आणि मलायकाच्या नात्याच्या चर्चा चांगल्याच रंगत आहेत. त्यांच्या लग्नाचे मुहूर्त ठरल्यापासून अनेकांचे वक्तव्य समोर येत आहेत. अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूरचे एक वक्तव्य समोर येत आहे. बोनी कपूर यांनी अर्जुन - मलायकाच्या लग्लाच्या चर्चा फक्त अफवा असल्याचे सांगितले आहे. 

काहीदिवसांपूर्वी या प्रेमी युगुलाच्या लग्नाची तारीख ठरली होती. १९ एप्रिल रोजी हे जोडपे विवाह बंधनात अडकणार आहेत. ख्रिश्चन धर्मपद्धतीने हे दोघे लग्न करणार आहेत. परंतू बोनी कपूर यांनी सर्व चर्चा अफवा असल्याचे सांगत लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.     

अर्जुन - मलायका नातेवाईक आणि मित्र - मैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. यामध्ये मलायकाच्या गर्लगँगचा सुद्धा समावेश आहे. त्याचप्रमाणे अर्जुनचा खास मित्र अभिनेता रणवीर सिंग पत्नी दीपिका पादुकोन सोबत उपस्थित राहणार आहे. बॉलिवूडकर या दोघांच्या लग्नासाठी फारच उत्सुक असल्याचे दिसत आहे. ज्यामध्ये करण जोहर आणि अभिनेत्री करिना कपूरचे नाव पुढे येत आहे.