मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा सिनेमा 'हाऊसफुल्ल 4' ने सिनेमागृहात धम्माल केली आहे. सिनेमाला मिळणारा भरघोस प्रतिसाद आणि शानदार कमाईमुळे पाच दिवसांत 100 करोड रुपयांचा आकडा गाठला आहे. अक्षय कुमार आणि बॉबी देओलच्या "हाऊसफुल्ल 4' या सिनेमाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. दिवाळीच्या दिवसांत चांगलीच कमाई केली आहे.
मंगळवारी सिनेमाने 24 करोड रुपयांची कमाई केली आहे. यानुसार आतापर्यंत सिनेमाने 111.78 रुपयांची कमाई केली आहे. पाच दिवसांतच 'हाऊसफुल्ल 4'ने इतर हिंदी कॉमेडी सिनेमांपेक्षा सर्वाधिक कमाई केली आहे. सिनेमाला दिवाळीच्या सणाला शुभ लाभ झाला आहे.
महत्वाचं म्हणजे या सिनेमाने एका आठवड्यातच 125 करोड रुपयांचा आकडा पार केला आहे. भारतभर अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल्ल 4'ची चर्चा आहे. पण यूपी, बिहार, राजस्थान, गुजरात सारख्या शहरांमध्ये या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
#HouseFull4 sets the BO on Day 4 ... National holiday, expectedly, gave biz big push... Tue-Thu biz is extremely crucial for strong Week 1 total... Fri 19.08 cr, Sat 18.81 cr, Sun 15.33 cr, Mon 34.56 cr. Total: ₹ 87.78 cr. #India biz. #HF4
— taran adarsh (@taran_adarsh) October 29, 2019
धनत्रयोदशीच्या दिवशी सिनेमाने 19.08 करोड रुपये, दुसऱ्या दिवशी 18.81 करोड रुपये, तिसऱ्या दिवशी 15.33 करोड रुपये आणि चौथ्या दिवशी 34.56 करोड रुपयांची कमाई केली आहे. आता 'सांड की आंख', 'मेड इन चायना' 'हाऊसफुल्ल ४' या तीन चित्रपटांमध्ये कांटे की टक्कर बघायला मिळत आहे. तब्बल १० वर्षांनंतर तीन चित्रपट एकत्र चित्रपटगृहात धडकले आहेत. परंतु बॉक्स ऑफीसवर 'हाऊसफुल्ल ४' चित्रपटाने बाजी मारली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'हाऊसफुल ४' चित्रपटाने जवळपास १०० कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे.