मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना आज त्याचा ३५वा वाढदिवस साजरा करतोय. त्याच्या वाढदिवशीच एक गुड न्यूज समोर आली आहे. नुकताच आयुषमानचा 'ड्रीम गर्ल' चित्रपट प्रदर्शित झाला. 'ड्रीम गर्ल' प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी आयुषमानचा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. वाढदिवशी आयुषमानला मिळालेली ही भेटच ठरली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०.५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
या वर्षातील मिड-रेंज चित्रपटांमध्ये विकी कौशलच्या 'उरी'ने ८.२० कोटींची ओपनिंग केली होती. कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांच्या 'लुका छुप्पी'ला ८ कोटींची ओपनिंग मिळाली होती. तर नितेश तिवारी दिग्दर्शित 'छिछोरे'ने पहिल्या दिवशी ७.३२ कोटींची कमाई केली.
#DreamGirl takes a heroic start... Emerges #AyushmannKhurrana’s biggest opener to date... Has also opened bigger than several mid-range films [2019] like #Uri [₹ 8.20 cr], #LukaChuppi [₹ 8.01 cr] and #Chhichhore [₹ 7.32 cr]... Fri ₹ 10.05 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) September 14, 2019
आयुषमानच्या 'ड्रीम गर्ल'ने हे रेकॉर्ड तोडले आहेत. या चित्रपटाने आयुषमानच्या 'बधाई हो' (७.३५ कोटी) 'आर्टिकल १५' (५.२ कोटी), 'अंधाधुन' (२.७० कोटी), 'शुभ मंगल सावधान' (२.७१ कोटी) या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. आयुषमानला 'बधाई हो' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
Ayushmann Khurrana versus Ayushmann Khurrana... Day 1 biz...
2019: #DreamGirl ₹ 10.05 cr
2018: #BadhaaiHo ₹ 7.35 cr [Thu; #Dussehra]
2019: #Article15 ₹ 5.02 cr
2017: #ShubhMangalSaavdhan ₹ 2.71 cr
2018: #AndhaDhun ₹ 2.70 cr
2017: #BareillyKiBarfi ₹ 2.42 cr#India biz.— taran adarsh (@taran_adarsh) September 14, 2019
आज १४ सप्टेंबरला आयुषमान ३५वा वाढदिवस साजरा करत आहे. 'विकी डोनर' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये करियरची सुरुवात केली. त्यानंतर आयुषमानने वेगळ्या विषयांवरील अनेक चित्रपटांमध्ये अतिशय सुंदरपणे भूमिका साकारत स्वत:ची वेगळी ओळखच निर्माण केली आहे.