close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'सिम्बा-द लायन किंग' चित्रपटाची पहिल्याच दिवशी दमदार कमाई

काळात 'सिम्बा-द लायन किंग' चित्रपट किती रूपयांचा आकडा गाठेल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Updated: Jul 20, 2019, 01:19 PM IST
'सिम्बा-द लायन किंग' चित्रपटाची पहिल्याच दिवशी दमदार कमाई

मुंबई : 'एक सच्चा राजा ये सोचता है, की वो क्या दे सकता हैं' एक राजा आपले कर्तव्य साधण्यासाठी किती कष्ट करतो, त्याचप्रमाणे कोण- कोणत्या समस्यांना सामोरे जातो या सर्वांचा प्रत्येय 'सिम्बा-द लायन किंग' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांना अनुभवता येत आहे. हा चित्रपट चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने जवळपास ११ कोटींपर्यंत मजल मारली आहे. येत्या काळात हा चित्रपट किती रूपयांचा आकडा गाठेल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहे. चित्रपट ५ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे. १९ जुलैला प्रदर्शित झालेला हा चित्रपट भारतात एकूण २ हजार १४० स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'सिम्बा-द लायन किंग' चित्रपट हिंदी, तेलुगू, इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये डब करण्यात आला आहे.

अॅनिमेशच्या जगात साकारण्यात येणाऱ्या या चित्रपटाला आवाज खुद्द किंग खान अभिनेता शाहरूख खान आणि मुलगा आर्यन खान यांनी दिला आहे. मुफासा या व्यक्तीरेखेला शाहरूखने आवाज दिला आहे, तर सिम्बा या व्यक्तीरेखेला आर्यनने आवाज दिला आहे.