'तान्हाजी'चा ५१व्या दिवसानंतरही बोलबाला

'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' चित्रपटाची दमदार कामगिरी  

Updated: Mar 1, 2020, 02:26 PM IST
'तान्हाजी'चा ५१व्या दिवसानंतरही बोलबाला

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) स्टारर 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' (Tanhaji: The Unsung Warrior) चित्रपटाला प्रदर्शित होवून दोन महिने लोटले आहेत. तरी देखील चित्रपटाचा बोलबाला काही केल्या कमी होण्याचा नाव घेत नाही. अजून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. 'तान्हाजी'नंतर अनेक चित्रपटं रूपेरी पडद्यावर दाखल झाली. पण 'तान्हाजी' चित्रपटासमोर कोणताच चित्रपट जास्त काळ टिकला नाही. 

सलग ५१व्या दिवशी देखील हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या माहितीनुसार चित्रपटाने गेल्या शुक्रवारी १२ कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे. प्रदर्शनापासून ते आतापर्यंत चित्रपटाने तब्बल जवळपास २६७.५० कोटी रूपयांचा आकडा पार केला. 

'तानाजी' के लिए आज आई एक और गुड न्यूज, आप भी जानेंगे तो हो जाएंगे खुश

चित्रपट प्रदर्शित होवून ८ अठवडे झाले आहेत. चित्रपटाची वाढती लोकप्रियता पाहता येत्या काही दिवसात 'तान्हाजी' चित्रपट आणखी मजल मारेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असला तरी, त्याचा कोणताही परिणार बॉक्स ऑफिसवर झालेला दिसून येत नाही.

१० जानेवारी रोजी प्रदर्शित हा चित्रपट ऐतिहासिक कथे भोवती फिरताना दिसत आहे. प्रेक्षकांना देखील हा चित्रपट चांगलाच पसंतीस पडलेला आहे. सैफ अली खान, अजय देवगन, काजोल, शरद केळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या Tanhaji The Unsung Warrior या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच पकड बसवली आहे. 

यंदाच्या वर्षाचा सर्वात मोठा चित्रपट म्हणून 'तान्हाजी'ची ओळख निर्माण झाली आहे. शिवाय जागतिक स्तरावर सर्वात जास्त कामाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'तान्हाजी' चौथ्या क्रमांकावर आहे. आता येत्या काळात 'तान्हाजी' किती कोटी कमवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.