अक्षय कुमारवर मोठं संकट; म्हणाला, 'हा देश स्वातंत्र्य आहे पण...'

सुपरस्टार अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'रक्षाबंधन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

Updated: Aug 9, 2022, 04:15 PM IST
अक्षय कुमारवर मोठं संकट; म्हणाला, 'हा देश स्वातंत्र्य आहे पण...' title=

मुंबई : सुपरस्टार अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'रक्षाबंधन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटावरुन गदारोळ झाला आहे. रक्षाबंधन या सिनेमाबाबत वाद निर्माण झाला असून आता या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. #BoycottRakshabandhan हा सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत आहे. अशा परिस्थितीत आता अक्षय कुमारने यावर प्रतिक्रिया देत द्वेष करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. खिलाडी कुमार म्हणाला आहे की, चित्रपट भारताच्या अर्थव्यवस्थेला मदत करतात, त्यामुळे त्यांच्यासोबत असे करू नये.

असे अक्षय कुमारने सांगितलं
अक्षय कुमार नुकतंच कोलकाता येथे 'रक्षाबंधन' या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करत होता. यावेळी त्याने 'बहिष्कार रक्षाबंधन' ट्रेंडवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, भारत हा एक स्वतंत्र देश आहे, जिथे कोणीही त्याला वाटेल ते करू शकतो.

 "मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे हा एक स्वतंत्र देश आहे आणि प्रत्येकजण त्यांना हवे ते करू शकतो, परंतु हे सगळं भारताच्या अर्थव्यवस्थेला मदत करतं. आपण सगळेजण सर्वात मोठा आणि महान देश होण्याच्या मार्गावर आहोत. मी त्यांना विनंती करतो की ट्रोलर्स आणि तुम्ही मीडिया त्यात पडू नका."

चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत
अक्षय कुमार शुक्रवारी, 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होण्याआधी देशभरात त्याच्या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. कोलकाता नंतर अभिनेता आणि त्याची टीम सादिया खतीब, स्मृती श्रीकांत, दीपिका खन्ना आणि सहजमीन कौर यांच्यासह लखनौला गेली आणि आता दिल्लीलाही जाणार आहे.