'हिने काय खाल्लंय?' विचारणाऱ्या महिलेला अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर; म्हणाली, 'तू स्तनपान करणाऱ्या..'

Actress Vs Food Blogger: अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच आई झाली असून तिचा आधीचा आणि आताचा फोटो पोस्ट करत एका फूड ब्लॉगरने तिच्यावर निशाणा साधला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 23, 2024, 01:04 PM IST
'हिने काय खाल्लंय?' विचारणाऱ्या महिलेला अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर; म्हणाली, 'तू स्तनपान करणाऱ्या..' title=
स्वराने दिलं जशास तसं उत्तर

Actress Vs Food Blogger: अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच आई झाली आहे. मात्र गरोदर असताना तिचं वजन वाढल्याच्या मुद्द्यावरुन तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. असं असतानाच तिने अशा एका ट्रोलरला सणसणीत उत्तर दिलं आहे. शुक्रवारी फूड ब्लॉगर असलेल्या नलिनी उनागर नावाच्या महिलेने सोशल मीडियावर स्वराचे दोन फोटो शेअर केले. या कोलाज फोटोत स्वराचे दोन लूक दिसत आहेत. एका फोटोत स्वरा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. हा फोटो तिच्या लग्नापूर्वीचा फोटो आङे. दुसरा फोटो हा स्वराच्या लग्नानंतरचा फोटो आहे. या दुसऱ्या फोटोमध्ये स्वराने साडी नेसली असून आई झाल्यानंतरचा तिचा लूक दिसत आहे. स्वराचे हे दोन्ही अवतारातील फोटो शेअर करत नलिनीने, 'तिने नेमकं काय खाल्लं आहे?' अशी खोचक कॅप्शन दिली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वराने या पोस्टला जशास तसं उत्तर दिलं आहे.

नेमका वाद कसा सुरु झाला?

काही दिवसांपूर्वीच स्वराने निलनीने केलेल्या एका विधानावरुन स्वराने तिला झापलं होतं. आपण शाकाहारी असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचं नलिनीने आपल्या एक्स अकाऊंटवरुन म्हटलं होतं. नलिनीने शाकाहारी असल्याचा अभिमान असल्याचा दावा करताना सोबत भात आणि पनीरच्या भाजीचा फोटो पोस्ट केलेला. "मी शाहाहारी असल्याचा अभिमान आहे. माझ्या ताटामध्ये अश्रू, हिंसाचार आणि वाईट वाटण्याची भावना नाहीये," अशी कॅप्शन नलिनीने दिली होती. 

स्वरा म्हणाली, 'तुम्ही गायीच्या वासराचं दूध चोरता'

यावर स्वराने रिप्लाय दिला होता. "प्रामाणिकपणे… मला शाकाहारी लोकांचा हा स्वधर्मीपणा समजत नाही. तुमच्या संपूर्ण आहाराचा विचार केल्यास गायीच्या वासराला त्याच्या आईचे दूध नाकारणे, गायींची बळजबरीने गर्भधारणा करणे, नंतर त्यांना त्यांच्या बाळांपासून वेगळे करणे आणि त्यांचे दूध चोरणे यावर आधारलेला आहे. तुम्ही मूळांचा भाग खाल्ला जातो अशा भाज्या खाता? यामुळे संपूर्ण वनस्पती मारते! कृपया केवळ बकरी ईद असल्यामुळे या असल्या सद्गुणांचं दर्शन न दाखवता आराम करा," असं स्वरा म्हणाली होती.

स्वराचा खोचक टोला

स्वराचा हा टोला न पटल्याने नलिनीने थेट तिच्या दिसण्यावरुन तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. आई झालेल्या स्वराला तिच्या वजनावरुन बोलताना निलीने तिचे फोटो शेअर केले. या पोस्टला रिप्लाय देताना, "तिला बाळ आहे. पुढल्या वेळेस अधिक चांगला प्रयत्न कर, नलिनी!" असा खोचक रिप्लाय स्वराने दिला.

आईचं वजन वाढल्यावरुन तू...

'याबद्दल सविस्तर बोलूयात, मी तुझ्या शाकाहारी असलेल्या पोस्टवरुन टीका केली. त्यामध्ये बकरी ईदच्या दिवशी मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा तुझा हेतू स्पष्ट होता. मात्र शाकाहारी असण्यावरुन माझ्याशी चर्चा करण्याऐवजी तू एका चिमुकल्याला स्तनपान करणाऱ्या आईचं वजन वाढल्यावरुन तिला लक्ष्य केलं. असं करुन तू स्वत:ला न्यूट्रीशनिस्ट म्हणवतेस?' असा प्रश्न स्वराने नलिनीला विचारला आहे. 

या दोघांच्या बाजूने त्याचे त्यांचे समर्थक या पोस्टवर रिप्लाय देताना दिसत आहेत.