'ब्रेकअप के बाद' नेहा म्हणते...

बॉलिवूडची पार्श्वगायिका नेहा कक्कर आणि अभिनेता हिमांश कोहली यांच्या ब्रेकअपच्या चर्चा चांगल्याच रंगत होत्या. दोघांनी त्यांचे नाते उघडपणे कबूल केले नव्हते.

Updated: Feb 10, 2019, 05:16 PM IST
'ब्रेकअप के बाद' नेहा म्हणते...

मुंबई: बॉलिवूडची पार्श्वगायिका नेहा कक्कर आणि अभिनेता हिमांश कोहली यांच्या ब्रेकअपच्या चर्चा चांगल्याच रंगत होत्या. दोघांनी त्यांचे नाते उघडपणे कबूल केले नव्हते. सिनेस्टार नेहमीच स्वतःचे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना देत असतात. नेहासुद्धा सोशल मीडियावर अपडेट राहून दैनंदिन जीवनातील घडामोडी तिच्या चाहत्यांना कळवत असते. सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो पोस्ट करणाऱ्या नेहा आणि हिमांश एकमेकांना अनफॉलो केले आहे.

नेहाच्या झालेल्या एका मुलाखतीत नेहाने सांगितले,'माझ्या जिवनातील तो सर्वात कठीन वेळ होता. मी पूर्णपणे नैराश्य अवस्थेत होते. त्याच्या सोबत जगणे फार कठीण झाले होते. पण आता या सगळ्या प्रकरणांमधून मी सावरले आहे.' हिमांश सोबत नेहमी फोटो पोस्ट करणाऱ्या नेहाने सिंगल असणे हे कधीही चांगले असल्याचे सांगितले आहे. 

 

अभिनय, नृत्य, गायन यांमध्ये अग्रेसर असलेली नेहा कक्कर म्हणते,'जेव्हा आपण नात्यात असतो तेव्हा आपल्या कुटुंबाला आणि मित्रमंडळीं वेळ देवू शकत नाही. आपला किमती वेळ फक्त आणि फक्त त्या एका माणसावर खर्च करतो जो त्या वेळेच्या बिलकूल लायक नसतो.' नेहाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर भलताच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत नेहे रणवीर सिंग आणि सारा अली खानच्या आख मेरे गाण्यावर थिरकताना दिसत आहे.