VIDEO : 'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके कोकणचे सूपूत्र अर्थात अभिमानी बाणेसाहेबांच्या भूमिकेत

 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पुन्हा एकदा धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. कुशल बद्रिके याने थुकरटवाडीच्या स्टुडिओत 'सवाल माझा ऐका' या कार्यक्रमात गेस्ट म्हणून कोकणचे सूपूत्र अर्थात अभिमानी बाणेसाहेब सहभागी झालेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 30, 2018, 04:43 PM IST
VIDEO : 'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके कोकणचे सूपूत्र अर्थात अभिमानी बाणेसाहेबांच्या भूमिकेत  title=

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पुन्हा एकदा धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. कुशल बद्रिके याने थुकरटवाडीच्या स्टुडिओत 'सवाल माझा ऐका' या कार्यक्रमात गेस्ट म्हणून कोकणचे सूपूत्र अर्थात अभिमानी बाणेसाहेब सहभागी झालेत. 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळ्यात अनेक सिनेमांना गौरवण्यात आलं. त्याच विषयावर चर्चा करण्यासाठी 'सवाल माझा ऐका' या थुकरटवाडीच्या LIVE कार्यक्रमात गेस्ट पोहोचले आहेत. कार्यक्रमाचा विषय होता, 'येणार आहेत गेस्ट, ठरवणार कुठला सिनेमा बेस्ट'

नारायण राणेंची भूमिका विनोदी अंगाने निभावली. थुकरवाडीत एका कार्यक्रमात 'गेस्ट' म्हणून बोलविण्यात आले होते, अभिमानी बाणेसाहेब यांना.  बाणेसाहेबांनी चक्क 'प्रहार' केला. कोकणची माणसे साधी भोळी, या गाण्याचे सूर ऐकताच बाणेसाहेब गरजलेत, आधी वैभव मांगलेला हे ऐकव. मग समजेल. कोकणची माणसे साधी आहेत. मात्र, ते वेळप्रसंगी कधीही 'प्रहार' करतात हे विसरु नये, असा इशारा दिला. अर्थात हा इशारा कोणाला होता?

पाहा हा व्हिडिओ :