मुंबई : झी मराठवरील लोकप्रिय कार्यक्रम ज्याने फक्त महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला ज्यांनी हसायला शिकवलं तो म्हणजे 'चला हवा येऊ द्या.' या कार्यक्रमाने सगळ्यांना भरभरून हसायला शिकवलं. यामधील एक उत्तम अभिनेता म्हणजे सागर कारंडे. पुण्यातील शिक्षिका ते अगदी थेट ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्यापर्यंत पात्र साकारतो आणि ती यशस्वी करतो.
या सागर कारंडेचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नाही. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे मिळालेली लोकप्रियता ही खरंच कौतुकाचा विषय आहे. सागर कारंडेचा स्ट्रगल हा खूप मोठा आहे. सुरूवातीला काम नसताना आपल्या आई-बाबांना काही गोष्टी ऐकून घ्याव्या लागत होत्या, ते फार जिव्हारी लागणारं होतं.
सागर कारंडे सांगतोय 'तो' किस्सा
सागर सांगतोय की,'आई-बाबा कधी कुणा नातेवाईकांकडे गेले तर अनेकदा प्रश्न विचारायचे. तुमचा मुलगा काय करतो? नाटत. त्याने काय होणार किती पैसे मिळतात. तेव्हा आई-बाबांची मान शरमेने खाली जायची. त्याचं फार वाईट वाटतं. त्याचवेळी माझ्या लग्नाचं पण सुरू होतं. तो किस्सा सांगताना सागर आपल्या पत्नीची खूप कृतज्ञता व्यक्त करतो.
त्यावेळी माझ्या पत्नीने मला खंबीर साथ दिली. तुम्हाला हवं ते करा. माझा पूर्ण सपोर्ट आहे. तसेच माझ्या भावंडांनी देखील मला खूप वेळा सांभाळून घ्यायचे. एका नाटकाचे मला तेव्हा 200 रुपये मिळायचं. महिन्याला सहा प्रयोग म्हणजे महिन्याचा पगार 1200 रुपये