बनवाबनवीः चंद्रावर पहिल्यांदा 'आमचा पार्वती' गेला! सचिन पिळगावकर यांनी शेअर केला जुना फोटो

'अशी ही बनवा बनवी' हा सिनेमा आजही तितकाच लोकप्रिय आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सिद्धार्थ रे. यांनी या सिनेमातील अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मात्र नुकतंच चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिग करत इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिग करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. विक्रम लँडरने चंद्रावर पाऊल ठेवताच देशभरात उत्साहाची लाट उसळली.

Updated: Aug 24, 2023, 05:23 PM IST
बनवाबनवीः चंद्रावर पहिल्यांदा 'आमचा पार्वती' गेला! सचिन पिळगावकर यांनी शेअर केला जुना फोटो title=

मुंबई : अशी ही बनवा बनवी हा सिनेमा आज कोणाला माहिती नाही. हा सिनेमा पाहिला नसेल असा क्वचितच कोणी मराठी माणूस असेल. आत्तापर्यंतच्या प्रत्येक वर्गाने हा सिनेमा पाहिला आहे. आणि आजही हा सिनेमा तितकाच लोकप्रिय आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सिद्धार्थ रे. यांनी या सिनेमातील अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मात्र नुकतंच चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिग करत इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिग करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. विक्रम लँडरने चंद्रावर पाऊल ठेवताच देशभरात उत्साहाची लाट उसळली.

आता तुम्ही म्हणाल चांद्रयान आणि अशी ही बनवा बनवीचा काय संबध आहे? तर आता आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. चांद्रयान-3 यशस्वी लँण्डिंगनंतर अभिनेते सचिन पिळगावकर यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून तुमचंही हसू आवरणार नाही. अभिनेत्याने फेसबूकवर अशी ही बनवा बनवीमधील पार्वतीचा चंद्रावर बसलेला फोटो शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

एका चाहत्याने कमेंट करत लिहीलंय की, पहिल्या भारतीय व्यक्तीला चंद्रावर बसवण्याचा मान तुम्हालाच आहे, सर. तर अजून एकाने म्हटलंय, एक पुनरावर्ती आनंद देणारा सदाबहार चित्रपट! तर अजून एकाने लिहीलंय,  हा एकमेव मराठी चित्रपट आहे जो मी बऱ्याचदा repeat करून पहात असते तरी मन भरत नाही. एकसे एक बेहतरीन कलाकार आहेत . मला सगळेच आवडतात . अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे , सचिनजी निवेदिताजी. तर अजून एकाने लिहीलंय, i miss u sir.....लक्ष्या खरच खूप खूप आठवण येत आहे तुझी...परत येना एकदा लक्ष्या ..तुझी आणि अशोक मामा ची जोडी खरच सुपर हिट होती. तर अजून एकजण म्हणतोय, खूप छान सचीन सर यात ही तुमची विनोद बुद्धी पाहून सलाम. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय की,हा क्षण कधीच मनातून पुसला जाणार नाही.....! मराठी माणसाच्या...!

अशी ही बनवा बनवी हा सिनेमा खूप गाजला आजही प्रेक्षकांमध्ये या सिनेमाचं क्रेझ आहे. कितीही वेळी पाहिला तरी परत परत पाहावा असा हा सिनेमा आहे. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी या सिनेमात पार्वती ही भूमिका साकारली होती. पार्वती या कॅरेक्टरने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली. कुणीतरी येणारं गं हे गाणं याच सिनेमातील. जे प्रचंड गाजलं. आजंही प्रत्येक घरात डोहाळे जेवणाला हेच गाणं वाजतं. यावेळी पार्वतीचं डोहाळे जेवण असतं. त्यावेळंचा हा सीन आहे. जो फोटो सचिन पिळगावकर यांनी शेअर केला आहे.