'या' गावात चालतं 'लागिरं झालं जी'चं शूटिंग!

झी मराठीवरील कमी वेळात लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे लागिरं झालं झी. 

Updated: Jul 12, 2018, 02:24 PM IST
'या' गावात चालतं 'लागिरं झालं जी'चं शूटिंग!

मुंबई : झी मराठीवरील कमी वेळात लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे लागिरं झालं झी. यातील शीतल आणि अजिंक्यच्या प्रेमकहाणीने सर्वांनाच वेड लावलं. आता शीतली-अज्याची लव्हस्टोरी एका नव्या वळणारवर येऊन पोहचली आहे. कारण नुकतचं शीतल अजिंक्यचं लग्न झालयं. आता या मालिकेत काय काय घडणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. अज्या-शीतलीबरोबरच मालिकेतील राहुल्यानेही चांगलीच लोकप्रियता मिळवली. 
आता आपण जाऊया थेट मालिकेच्या सेटवर. हा सेट नसून गाव आहे. चांदवडी गावाचं नाव. या गावात लागिरं झालं जी चं शूटिंग चालतं. मालिकेच्या शूटिंगमुळे गावालाही वेगळी ओळख मिळाली आहे. आता शेकडो रसिक आपल्या लाडक्या कलाकारांना भेटायला चांदवडीला येतात. तर मग चला आपणही जाऊया चांदवडीला...