सैफ अली खानच्या या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

सैफ अली खानसाठी यंदाच्या वर्षाची सुरूवात दमदार ठरली आहे.

Updated: Aug 31, 2017, 06:25 PM IST
सैफ अली खानच्या या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च   title=

मुंबई : सैफ अली खानसाठी यंदाच्या वर्षाची सुरूवात दमदार ठरली आहे.

 पण गेल्या अनेक महिन्यांपासून चित्रपटांपासून दूर असलेला सैफ आता 'शेफ' या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. 

'शेफ' हा चित्रपट बाप -मुलाच्या नात्यावर अवलंबून आहे.  आजकाल पैसा कमवण्यासाठी पालक तासनतास मुलांपासून दूर राहतात. मुलांना भौतिक सुख देण्याच्या धडपडीमध्ये अनेकदा त्यांचा हक्काचा वेळ, प्रेम मुलांपासून लांब जाते या विषयावर 'शेफ' चित्रपटाची पटकथा आधारित आहे. 
मुलाच्या हट्टापायी विदेशात काम करणारा 'बाप' मुलाकडे कसा येतो ? त्यांच्यामधील नातं कसं खुलवतो यासाठी तुम्हांला 'शेफ' पहावाच लागेल. पण त्याआधी आज रिलीज झालेला 'शेफ' चित्रपटाचा हा ट्रेलर नक्की पहा. 

 

'शेफ' येत्या ६ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. राजा कृष्णा मेनन दिग्दर्शित हा सिनेमा हॉलीवुडची हिट फिल्म 'शेफ' चा हिंदी रीमेक आहे.