'परदेशात काढलेले फोटो जास्त क्लिअर अन्...', या पोस्टमुळे हेमांगी कवी ट्रोल

हेमांगी कवीची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Updated: Aug 25, 2022, 01:40 PM IST
'परदेशात काढलेले फोटो जास्त क्लिअर अन्...', या पोस्टमुळे हेमांगी कवी ट्रोल title=

मुंबई : अभिनेत्री हेमांगी कवी धुमाळ हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी नुकतीच ‘तमाशा Live’ या चित्रपटात दिसली. हेमांगी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. हेमांगा सोशल मीडियावर बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते. हेमांगी काही दिवसांपूर्वी परदेशात फिरायला गेली होती. त्याचे काही फोटो हेमांगीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत भारतात आणि परदेशात काढलेल्या फोटोंमध्ये काय फरक आहे हे हेमांगीनं सांगितला आहे. 

आणखी वाचा : कियारा अडवाणीच्या 'या' छोट्या बॅगच्या किंमतीत येतील अनेक फोन, Price जाणून व्हाल थक्क

हेमांगीनं ही पोस्ट तिच्या फेसबूक अकाऊंटवरून शेअर केली आहे. हेमांगीनं न्यूयॉर्कला फिरायला गेली होती. त्याचेच हे फोटो आणि व्हिडीओ तिनं शेअर केले आहेत. शेअर केलेल्या या फोटो आणि व्हिडीओवरून हेमांगीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

फोटो शेअर करत हेमांगी म्हणाली होती की, 'बाहेरच्या देशांमध्ये काढलेले फोटो जास्त क्लिअर आणि क्लीन येतात. आपल्या आणि आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये Pollution चा थर नसावा म्हणून असेल का? त.टी : सहज एक observation आहे, कुठला महान शोध लावल्याच दावा अध्यक्ष करत नाहीयेत याची मंडळाने नोंद घ्यावी. आपल्या देशातल्या pollution ला मी ही कारणीभूत आहे याची मला जाणिव आहे. तेव्हा नमस्कार.' 

आणखी वाचा : अरबाज आणि मलायकाच्या लग्नात असा दिसत होतो अर्जुन कपूर, फोटो पाहून व्हाल हैराण

हेमांगीची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी हेमांगीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'Apple मधुन काढशील तर आपल्याकडेही छान येतात. सगळ्यात महत्त्वाचं कॅमेरा क्वालिटी मॅटर करते. अजून महत्त्वाचं तू जर बाहेर म्हणजे घराबाहेर फोटो काढत असशील स्वच्छ प्रकाशात तर कधीपण छान येतात फोटोज. हे माझं वैयक्तिक मत. तुझं वैयक्तिक मत तुझं आहे. माझं ते माझं आहे. माझं ते माझं आणि माझं तेही तुझं असं माझं म्हणणं अजिबात नाहीये.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तुला पण बॅन मोहीमेचा भाग व्हायचे आहे का? तिसरा नेटकरी म्हणाला, 'मी माझ्या देशात साध्याच मोबाईलने फोटो काढतो.... आणी आश्चर्य म्हणजे तु बाहेरच्या देशात काढलेल्या फोटोंपेक्षा आमचे फोटो छान येतात...'