मुंबई : देशात सर्वत्र कोरोनां सावट आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. हे युद्ध लढण्यासाठी डॉक्टर्स, नर्स, पोलीस त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता देशाची सेवा करत आहेत. त्यामुळे पोलिसांची सुरक्षा लक्षात घेत बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने त्यांना सॅनिटायझरचं वाटप केलं. त्याचप्रमाणे उपासमारीची वेळ आलेल्या मजुरांची देखील मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानचे आभार मानले आहेत.
ते म्हणाले, 'आमच्या महाराष्ट्र पोलिसांमध्ये १ लाख सॅनिटायझरचे वाटप केल्यामुळे तुझे आभार.. ' सलमानच्या कामाची तसदी घेत उद्धव ठाकरे यांनी सलमानचे आभार मानले आहेत. सलमान खानने त्याच्या ‘फ्रेश’ (FRSH) या कंपनीत तयार करण्यात आलेले जवळपास १ लाख सॅनिटायझर पोलिसांमध्ये वाटले.
Thank you @BeingSalmanKhan for providing 1Lakh Hand Sanitizers to our @MumbaiPolice #WarAgainstVirus https://t.co/4qF5uU4IBv
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 30, 2020
लॉकडाऊन दरम्यान घरात राहून त्याने फ्रेश या नावाची नवी कंपनी सुरू केली आहे. या कंपनीमध्ये बॉडी स्प्रे, परफ्युम, साबण आणि सौंदर्य प्रसाधने यांची निर्मिती केली जाणार आहे. शिवाय या ब्रॅण्डच्या वस्तू लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहेत.
देशभरात कोरोनामुळं उदभवलेल्या या परिस्थितीमुळं कलाविश्वही बेजार झाल्याचं पाहायला मिळालं. शिवाय सलमानचा आगामी चित्रपट 'राधे'ला देखील लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे.