गायिका शकीरा 'या' आरोपानंतर न्यायालयात हजर

शकीरा फुटबॉलपटू गेर्रार्ड पीके आणि आपल्या दोन मुलांसह स्पेनमध्ये राहते.

Updated: Jun 6, 2019, 06:31 PM IST
गायिका शकीरा 'या' आरोपानंतर न्यायालयात हजर title=

नवी दिल्ली : सुपरस्टार शकीरावर कोर्टाची पायरी चढण्याची वेळ आली आहे. १४.५ मिलियन युरो कर बुडवल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. कर बुडवल्याप्रकरणी तिला बार्सिलोनातील न्यायालयात हजर होण्याचे सांगण्यात आले होते. सुप्रसिद्ध गायिका शकीरा पत्रकार, फोटोग्राफर्स आणि टेलिव्हिजन कॅमेरांपासून लपत न्यायालयाच्या परिसरात पोहचली. शकीरावर लावण्यात आलेल्या आरोपांची सुनावणी स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरु होणार होती. 

अमेरिकन गायिका शकीरा फुटबॉलपटू गेर्रार्ड पीके आणि आपल्या दोन मुलांसह स्पेनमध्ये राहते. शकीरावर तिने आणि तिच्या एका सल्लागाराने फसवणूक करत २०११ ते २०१४ पर्यंत स्पेनमध्ये राहत असूनही कर भरला नसल्याचा आरोप लावण्यात आला आहे. 

परंतु, स्पेनमधील मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शकीराने संपूर्ण कर वसूली केल्याचे सांगण्यात आले आहे.

२०१० च्या फीफा वर्ल्ड कपचं अधिकृत थिम सॉन्ग 'वाका वाका' हे कोलंबियाची सुपर स्टार शकीराने गायलं होतं. फीफा वर्ल्ड कपचं 'वाका वाका' गाणं जगभरात तुफान गाजलं होतं. २०१६ मध्ये 'वाका वाका' गाण्याला यूट्यूबवर एक अरब व्ह्यूज मिळाले होते. या व्ह्यूजसह शकीरा हा आकडा पार करणारी तिसरी लॅटिन आर्टिस्ट ठरली होती.