'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दया बेनची एन्ट्री?

दिशा वकानीची मालिकेत वापसी होण्याची शक्यता आहे.

Updated: Jun 6, 2019, 05:48 PM IST
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दया बेनची एन्ट्री?

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतून 'दया बेन' म्हणून प्रत्येक घरांघरात पोहोचलेली टेलिव्हिजन अभिनेत्री दिशा वकानी चर्चेत आहे. मालिकेमधील दयाबेनने चाहत्यांच्या मनात आपलं एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. गेल्या वर्षभरापासून दिशा 'तारक मेहता का उल्टा चष्मा'पासून लांब आहे. दिशा मालिका सोडल्यामुळे चर्चेत आहे. परंतु आता 'दया बेन'च्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दिशा वकानीची वापसी होणार असल्याचं बोललं जात आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपनंतर दिशा मालिकेत पुन्हा एन्ट्री करणार असल्याची शक्यता आहे. 

दिशा वकानी आणि तिच्या टीमकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. परंतु दिशा पुन्हा शोमध्ये येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये दिशा प्रसुतीनंतर रजेवर होती. आई बनल्यानंतर तिने मालिकेमधून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. मात्र आता 'दया बेन' पुन्हा येण्याच्या चर्चेने चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

 
 
 
 

A post shared by Disha Vakani (@disha.vakani) on

दिशा वकानीचे पती आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये दिशाच्या शूटिंगच्या वेळा आणि मानधनामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मालिकेच्या निर्मात्यांनी नव्या दया बेनच्या चेहऱ्याचा शोध सुरु केल्याच्याही चर्चा होत्या. परंतु आता 'दया बेन' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.