भाऊ कदम यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं पत्नीला दिलं 'हे' खास गिफ्ट!

Bhau Kadam : भाऊ कदम यांच्या मुलीनं नुकताच त्यांच्या लग्नाचा वाढदिवसा साजरा केला. त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात भाऊ कदम यांनी पत्नीला काय भेट वस्तू दिली ते पाहायला मिळत आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 1, 2023, 06:05 PM IST
भाऊ कदम यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं पत्नीला दिलं 'हे' खास गिफ्ट! title=
(Photo Credit : Social Media)

Bhau Kadam : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते आणि कॉमेडी किंग भाऊ कदम यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांचे लाखो चाहते आहेत. भाऊ कदम यांना 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी कार्यक्रमातून ओळख मिळाली. दिवसेंदिवस त्यांच्या चाहत्यांची  संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, भाऊ कदम हे आता त्यांच्या या कार्यक्रमामुळे नाही तर त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. भाऊ कदम यांनी त्याच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं एक खास भेट वस्तू दिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ते चर्चेचा विषय ठरत आहे. 

भाऊ कदम यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. या निमित्तानं त्यांनी त्यांच्या पत्नीसोबत मिळून लग्नाचा वाढदिवस साजरा केला. यावेळी भाऊ कदम यांनी त्यांच्या पत्नीला खास गिफ्ट सुद्धा दिलं आहे. आता त्यांनी काय भेट वस्तू दिली हे जाणून घ्यायचं असेल तर त्याविषयी आपल्याला कसं कळणार असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? तर याविषयी भाऊ कदम यांची लेक मृण्मयी कदममुळे कळलं आहे. मृण्मयीनं तिच्या युट्यूब चॅनलवरून त्याचा एक व्हिडीओ शेअर केल आहे. मृण्मयीनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

हेही वाचा : दोन वर्षं लिव्ह-इनमध्ये राहा आणि नंतर....; लग्नाआधी डिंपल कपाडियाने जावई अक्षयला दिला होता अजब सल्ला

भाऊ कदम यांची लेक मृण्मयीनं शेअर केलेल्या या व्हिडीओत त्यांच्या तीनही मुली दिसत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा पण त्यात पाहायला मिळत आहे. केक कापण्यापासून गिफ्ट्स देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाऊ कदम यांनी त्यांच्या पत्नीला सुंदर नक्षीकाम असलेले झुमके दिलं आहे. भाऊ कदम यांनी दिलेलं झुमके दिले असून हे सोन्याचे आणि डायमंडचे आहे. त्या सगळ्यांना या व्हिडीओत आनंदी पाहून त्यांचे चाहते देखील आनंदी झाले आहेत. त्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या कमेंट केल्या आहेत. 

भाऊ कदम यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यांना फू बाई फू या कार्यक्रमातून ओळख मिळाली होती. त्यांच्या कॉमेडी टायमिंगचे सगळे चाहते झाले. त्यानंतर त्यांना चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून खूप जास्त लोकप्रियता मिळाली. आता भाऊ कदम यांनी सगळ्यांच्या मनात अशी जागा निर्माण केली आहे की त्यांची जागा घेणं कोणालाही कठीण आहे.