संजू सिनेमाविरुद्ध तक्रार, सिनेमाच्या अडचणी वाढणार?

संजू सिनेमा अडचणीत सापडणार...

Updated: Jun 12, 2018, 07:55 PM IST
संजू सिनेमाविरुद्ध तक्रार, सिनेमाच्या अडचणी वाढणार? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर लवकरच बहुचर्चित संजू सिनेमामध्ये झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीचं सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. सिनेमाचा ट्रेलर लोकांकडून पसंत केला जात आहे. ट्रेलर पाहून सिनेमा चांगलाच चर्चेत आला आहे. याशिवाय सिनेमाचे 2 गाणे देखील रिलीज झाले आहे. पण सिनेमा आता वादात सापडण्याची शक्यता आहे. सिनेमाच्या विरुद्ध एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनसह एक तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सोशल अॅक्टिविस्ट प्रथ्वी म्हस्के यांनी सिनेमाच्या विरोधात एक तक्रार नोंदवली आहे. सिनेमातील एका सीनवरुन ही तक्रार करण्यात आली आहे. टॉयलेट सीनबाबत त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. सिनेमाच्य़ा ट्रेलरमध्ये संजय दत्त जेलमध्ये असतांना टॉयलेचमधून पाणी येतांनाचं दृष्य दाखवण्यात आलं आहे. या सीनवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार सरकार आणि जेल अधिकारी जेलची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत. आम्ही कधीही अशा घटना नाही ऐकल्या. याआधी गँगस्टरवर अनेक सिनेमे बनवण्यात आले. जेलबाबतचे अनेक सीन यामध्ये दाखवण्यात आले पण अशी घटना कधी नाही पाहिली. असे सीन्स जेल आणि अधिकाऱ्यांवर चुकीचा प्रभाव टाकतात. जर सिनेमातून हा सीन काढला नाही तर याबाबत कोर्टात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

29 जूनला हा सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमाबाबत अनेकांच्या मनात उत्सूकता आहे. संजय दत्तच्या जीवनावर हा सिनेमा बनवण्यात आला आहे.