SANJU प्रमाणेच हटके आहे MANJUची कहाणी...

राजकुमार हिरानी दिग्दर्शित संजू हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमात रणबीर कपूरने मुख्य भूमिका निभावलीये. 

Updated: Jun 12, 2018, 07:51 PM IST
SANJU प्रमाणेच हटके आहे MANJUची कहाणी... title=

मुंबई : राजकुमार हिरानी दिग्दर्शित संजू हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमात रणबीर कपूरने मुख्य भूमिका निभावलीये. या सिनेमाचा ट्रेलर आल्यापासून सिनेमाची उत्सुकता आहे. संजय दत्तच्या जीवनावर आधारित या सिनेमात रणबीरने संजयची भूमिका साकारलीये. संजूला मिळत असलेल्या या प्रसिद्धीमुळे आता मंजूचा व्हिडीओही सोशल मीड्यावर चांगलाच व्हायरल होतोय.

मंजूचा हा व्हिडीओ एक दिवस आधीच यूट्यूबवर अपलोड करण्यात आलाय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. याची कहाणी संजूच्या कहाणीशी मिळतीजुळती आहे. मंजू नावाची एक कामवाली आहे जिने आपल्या मालकांचे जगणे कठीण केलेय. मंजूचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ संजूचा स्पूफ आहे. 

संजू या सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलेय. या सिनेमात रणबीरसह दिया मिर्झा, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, विक्की कौशल, करिश्मा तन्ना आणि मनीष कोईराला यांच्या भूमिका आहेत.