Coronavirus : आणखी एका कलाकाराचा कोविड-१९ मुळे मृत्यू

कोरोनाने घेतला कलावंताचा बळी 

Updated: Apr 20, 2020, 09:04 AM IST
Coronavirus : आणखी एका कलाकाराचा कोविड-१९ मुळे मृत्यू  title=

मुंबई : प्रसिद्ध बेस गिटारिस्ट मॅथ्यू सिलिगमॅन (Matthew Seligman) यांच कोरोना व्हायरसमुळे निधन झालं आहे. वयाच्या ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. त्यांनी १९८५ मध्ये लाइव ऍडमध्ये दिवंगत संगीत आयकन डेविड बॉबी (David Bowie) परफॉर्म केलं आहे. 

१९८० च्या दशकात न्यू वेवच्या दृष्यात सेलिगमॅनच्या भूमिकेकरता त्यांना ओळखलं जातं आहे. ते सॉफ्ट बॉइज आणि द थॉम्पसन ट्विन्सचे सदस्य होते. जे थॉमस डॉल्बीसोबत देखील काम करत होते. 

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, डॉल्बीने सेलिगमॅनच्या निधनाची बातमी दिली. या स्टार कलाकाराच्या आठवणीत १९ एप्रिल रोजी लाइव कार्यक्रम आयोजित केला होता. 

कोरोनाने भारतात देखील थैमान घातलं आहे. आतापर्यंत देशात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १६,११६ हजारांवर पोहोचली आहे. देशात कोरोनामुळे ५१९ लोकांचा बळी गेला आहे. 

 दरम्यान या विषाणूमुळे अभिनेता आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने देखील त्यांचा आवडता व्यक्ती गमावला आहे. हा दु:खद प्रसंग फक्त रणबीर आणि आलियावर ओढावला नसून जगातील अनेकांनवर ओढवला आहे. 

रणबीर आणि आलियाने मुंबईतील एका पंचतारंकित हॉटेलच्या वेटरप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आलियाने आपले दु:ख व्यक्त केले आहे. वेटर रोनाल्ड डीमेलो यांचा एक फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'रोनाल्ड यांची ही दु:खद बातमी ऐकल्यानंतर अत्यंत वाईट वाटलं. ते त्यांचा कामात आणि क्षेत्रात चोख होते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर ते दिवस कसा होता असा प्रश्न नक्की विचारायचे.'असं तिने लिहलं आहे.

शिवाय, हा फोटो त्यांच्या निवृत्ती दिनाचा फोटो असल्याचं देखील आलियाने सांगितले आहे. रोनाल्ड यांचा स्वत:चा देखील एक हॉटेल होता. कोरोनाचं सावट संपूर्ण जगावर आहे. या धोकादायक विषाणूची लागण आतापपर्यंत लाखो नागरिकांना झाली आहे. तर कोरोना व्हायरसने आतापर्यंत हजारो नागरिकांचा जीव घेतला आहे. या सर्व भीतीच्या वातावरणात एक दिलासादायक बाब म्हणजे या आजारातून हजारो रुग्ण सुखरूप बरे देखील होत आहेत.