close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

# Cricket २४ तास : भारत- पाकिस्तान सामन्यापेक्षा पाऊसच ट्रेंडमध्ये; ऋषी कपूर म्हणतात....

जगात सर्वत्र भारत विरूद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Updated: Jun 16, 2019, 01:08 PM IST
# Cricket २४ तास : भारत- पाकिस्तान सामन्यापेक्षा पाऊसच ट्रेंडमध्ये; ऋषी कपूर म्हणतात....

मुंबई : जगात सर्वत्र भारत विरूद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण आजच्या या बहुप्रतिक्षित सामन्यावर पावसाचे सावट आहे. आजच्या क्रिकेट सामन्याची उत्कंटा फक्त क्रिकेट  प्रेमींना नाही, तर बॉलिवूडकरांना सुद्धा लागली आहे. बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर सोशल मीडियावर आपल्या अनोख्या अंदाजात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

पावसामुळे यंदाच्या विश्वचषकातील चार सामने रद्द करण्यात आले आहेत. याच धर्तीवर ऋषी कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक अनोखं ट्विट पोस्ट केले ज्यामध्ये त्यांनी चषकाच्या चिन्हाचा वापर केला आहे. त्यांचे हे ट्विट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. छत्रीच्या आकाराचा चषक त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे चषक म्हणून पोस्ट केले आहे. 

त्यांच्या या पोस्टनंतर अनेक क्रिकेट  प्रेमींना आणि बॉलिवूडकरांच्या प्रतिक्रिया येत आहेत. हा फोटो पोस्ट शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये 'आतंरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे चषक' असे लिहिले आहे. 

शिवाय पाकिस्तानचे माजी गोलंदाज शोएब अख्तरने सुद्धा सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. हा फोटो देखील प्रचंड व्हायरल होत आहे. फोटो शेअर करत शोएबने कॅप्शनमध्ये 'रविवारचा सामना काही प्रमाणात असा असू शकतो...' असे लिहिले आहे.