मुंबई : आईची महती सांगणाऱ्या चित्रपटांविषयी विचारलं असता अनेकदा नावांची रिघ लागते. पण, त्याच ऐवजी वडिलांच्या भूमिकेविषयी सांगणाऱ्या चित्रपटाचं नाव विचारलं असता काही क्वचित नावं समोर येतात. पण, अनेक असे चित्रपट आहेत ज्यामध्ये या 'बाप' माणसाची महती गायली गेली आहे. फक्त अनेकदा ती दुर्लक्षित राहिली हे नाकारता येणार नाही.
'संजू' म्हणू नका किंवा मग 'वेक अप सिड', या आणि अशा कित्येक चित्रपटांतून आईची माया ज्याप्रमाणे अधोरेखित करण्यात आली त्याचप्रमाणे मुलांना वठणीवर आणणारे बाबाही तितकेच महत्त्वाचे होते. हिंदी कलाविश्वात वडिलांच्या या भूमिकेचे विविध पैलू चित्रपटांतून मांडण्यात आले. अगदी मित्रापासून ते आधारस्तंभापर्यंतच्या भूमिकेत ही बाप माणसं आपल्या भेटीला आली. 'फादर्स डे'च्या निमित्ताने बॉलिवूडमधील अशाच काही चित्रपटांतील भन्नाट आणि बाप संवादांवर आपण नजर टाकत या सुपरहिट अशा 'बाबा'ला सलाम करणार आहोत.
''म्हारी छोरिया छोरों से कम है के''- दंगल
''खाली फीस भरने से पापाकी ड्युटी नही होती, पापा की ड्युटी होती है बच्चों की खुशियाँ''- दो दूनी चार
''मेरा बेटा कोई गुजरा हुआ वक्त नही है.... जो लौटके वापस नही आ सकता''- संजू
''जिंदगी मे चाहे कुछ हो जाए, कुछ भी, मै हमेशा तुम्हारे साथ हूँ''- ये जवानी है दीवानी
''औलाद के आँसू बाप के दिल पे तेजाब की बूँद की तरह गिरते हैं, और उसे छल्ली कर देते है''- बेताज बादशहा
''बाप का दिल हर वक्त क़डक नही, अक्सर मजबूर होता है''- बॉबी जासूस
''मै दिखती हूँ माँ जैसी सब कहते है, सब कहते है, सच कहते है, पर मैं हूँ अपने पापा की बेटी''- पीके