बाप मारतोय आणि पोरगा म्हणतोय 'झुकेंगा नही साला', नक्कीच पहा हा व्हिडिओ

'झुकेंगा नही साला'चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याची जोरदार चर्चा सुरु आहे. 

Updated: May 14, 2022, 02:11 PM IST
बाप मारतोय आणि पोरगा म्हणतोय 'झुकेंगा नही साला', नक्कीच पहा हा व्हिडिओ title=

मुंबई : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'ने घातलेली भुरळ लोकांच्या अजूनही उतरलेली नाही. लहान मोठ्यापासून सगळेच 'पुष्पा'च्या 'झुकेंगा नही साला'चे दिवाने झाले आहेत.

'पुष्पा'चा अजरामर झालेला 'झुकेंगा नही साला' डायलॉग लहान मुलांपर्यंतही पोचला आहे. याच 'झुकेंगा नही साला'चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याची जोरदार चर्चा सुरु आहे.

एक दोन वर्षाचा मुलगा हट्ट करत आहे. त्याचा तो हट्ट पुरविण्याऐवजी त्या मुलाला त्याचे वडील मारल्यासारखे करत आहेत. वडील त्याला लटके रागाने बोल्ट आहेत. पण, त्यामुळे तो लहान मुलगा अधिकच चिडतो आणि चिडून मध्येच 'झुकेंगा नही साला' म्हणतोय.

हा व्हिडीओ कुठला आहे काय आहे हे समजू शकलं नाही. मात्र, या 'झुकेगा नाही साला' व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.